अंतोदय अन्न योजनाकार्डधारकांना मिळणार २ किलो साखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2023 06:52 PM2023-09-13T18:52:26+5:302023-09-13T18:52:47+5:30

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे.

Antodaya food scheme card holders will get 2 kg of sugar goa | अंतोदय अन्न योजनाकार्डधारकांना मिळणार २ किलो साखर

अंतोदय अन्न योजनाकार्डधारकांना मिळणार २ किलो साखर

googlenewsNext

नारायण गावस

पणजी: धान्य पुरवठा खात्यातर्फे अनेक वर्षानंतर आता चतुर्थी निमित्त अंतोदय अन्न योजना  रेशनकार्डधारकांना २ किलाे साखर देणार आहे. लाभार्थ्यांना ही साखर १३.५ रुपये प्रती किलाेने मिळणार आहे. तसेच त्यांना मोफत मिळणारे ३५ किलाे तांदुूळ व गहूही चतुर्थीपूर्वी दिले जाणार आहे.

राज्यात जावळपास ११ हजार अंतोदय अन्न याेजनेचे रेशनकार्ड लाभधारक आहे. या सर्व लाभार्थ्यांना  यंदा २ किलाे साखर फक्त  १३.५० रुपयात  मिळणार आहे. पूर्वी प्रती महिना ही साखर दिली जात होती. पण मागील अनेक वर्षे ती बंद होती आता पुन्हा   खात्याने  ही साखर या लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी पुरवठा खात्याने साखर तसेच तांदूळ गहूचा पुरवठा स्वास्थ धान्य दुकानांपर्यंत पाेहचविण्यास सुरुवात केेली आहे. सर्व लाभार्थ्यानी हे धान्य घेण्याचे  आश्वासन नागरी पुरवठा खात्याने केेले आहे.

खात्याने इतर सर्व रेशन कार्ड परत करण्यास लोकांना सांगितले आहे. पण अजूनपर्यंत फक़्त १४ हजार रेशनकार्डधारकांनी कार्ड परत केली आहे. फक्त आता अंतोदय अन्न याेजनेच्या  लाभार्थ्यांना याचा लाभ  होणार  आहे. इतर रेशन कार्डधारकांना याचा लाभ होणार नाही. त्यामुळे इतर लाेकांनी आपली रेशन कार्ड खात्याकडे परत करावी. लवकरच त्यांना नवे कार्ड दिले जाणार  असे आवाहन या अगोदर खात्याच्या मंत्र्यांनी व मुख्यमंत्र्यांनीही केले आहे. 
या विषयी खात्याचे संचालक  गाेपाळ पार्सेकर यांना  विचारले असता त्यांनी  सांगितले चतुर्थीपूर्वी २ किलो साखर  अंतोदया अन्य याेजना रेशनकार्डधारकांना दिले जाणार आहे. या पुढे त्यांना प्रत्येक महिन्यात १ किलाे साखर मिळार आहे. यावैणी गेल्या महिन्याची आणि या महिन्याची  मिळून दोन किलो साखर दिली जात आहे, असे संचालक पार्सेकर म्हणाले.

Web Title: Antodaya food scheme card holders will get 2 kg of sugar goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.