कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 08:32 PM2018-11-02T20:32:23+5:302018-11-02T20:33:38+5:30

विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत.

At any moment the assembly election, suggested by the dy speaker of goa assembly | कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

Next

म्हापसा : विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे उपसभापती मायकल लोबो यांनी म्हटले. तसेच, आगामी निवडणुकीत मतदार नेत्यांना आपली जागा दाखवून देताना राज्यात बदल घडवून आणतील, असा दावाही लोबो यांनी केली आहे. 

कळंगुट येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी लोबो बोलत होते. सध्या ज्या गतीने राजकीय हालचाली सुरू आहेत. प्रशासनातील कामकाज सुरू आहे ते पाहता राजकारणात त तसेच लोकात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकांना गृहीत धरुन चालले जात आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणाला होवू शकतात, असा दावा लोबो यांनी केला आहे. राज्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळले आहेत. मतदार शहाणा झाला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदार राज्यात बदल घडवून आणणार असल्याचे ते म्हणाले. 

मतदार लोकप्रतिनिधींना आपली कामे करुन घेण्यासाठी निवडत असतात. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही बऱ्याच मोठ्या असतात. अशा मतदारांच्या अपेक्षा भंग करुन स्वत:च्या स्वार्थापायी दुसºया पक्षात प्रवेश करणे व लोकांना गृहीत धरुन चालणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी हे विधान केले आहे. भाजपात आलेल्या दोन आमदारां व्यतिरिक्त आणखीन दोन आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून तसा निर्णय त्या दोन आमदारांनी घेतल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील व लोकांच्या अपेक्षेचा भंग होणार असल्याचे लोबो म्हणाले. राज्यातील सरकार यशस्वीपणे चालवायचे असल्यास सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे; पण सध्याचा विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पाडण्यास असमर्थ ठरला आहे. विरोधकांकडून विषयांची मांडणी योग्य प्रकारे केली जात नाही. त्यांनी योग्य भूमिका मांडली असती, सरकारातील उणीवांवर बोट ठेवले असते तर सरकार सुद्धा चांगल्या प्रकारे चालले असते असेही लोबो यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारा संबंधी लोबो यांना विचारले असता त्यांनी त्यावर स्वत: निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले; पण सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी लोकांना चांगले प्रशासन उपलब्ध करुन देण्यासाठी जबाबदार व्यक्तीची गरज गोव्याला असल्याची पुष्ठी त्यांनी पुढे जोडली. सरकारातील जेष्ठ मंत्री सुदीन ढवळीकर ही जबाबदार व्यक्ती असू शकते का असा प्रश्न त्यांना केला असता त्यावर पक्ष पातळीवर काय ते ठरवले जावू शकते असेही लोबो म्हणाले. 
काही दिवसापूर्वी अमेरिकेत उपचार घेवून गोव्यात आलेले माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी त्यांना वगळल्याबद्दल काढलेल्या नाराजीच्या सुरावर विचारले असता, त्यांना ज्याप्रकारे वगळण्यात आले त्यावर डिसोझा यांनी नाराजी व्यक्त करणे योग्य असल्याचे लोबो म्हणाले. ती त्यांची वैयक्तीक नाराजी असून एकेकाळी पक्षाला राज्यात उभारी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान डिसोझा यांनी दिल्याचेही लोबो यांनी सांगितले.  
 

Web Title: At any moment the assembly election, suggested by the dy speaker of goa assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.