खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्यासाठी मंत्र्यासह पत्नीचा न्यायालयात अर्ज

By सूरज.नाईकपवार | Published: January 5, 2024 05:30 PM2024-01-05T17:30:01+5:302024-01-05T17:30:21+5:30

पणजी पोलिस ठाणा हल्ला प्रकरण.

Application to court by wife of minister for permanent absence from hearing of case in panjim goa | खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्यासाठी मंत्र्यासह पत्नीचा न्यायालयात अर्ज

खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्यासाठी मंत्र्यासह पत्नीचा न्यायालयात अर्ज

सूरज नाईकपवार,मडगाव : पणजी पोलिस ठाणा हल्ला प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीस कायमस्वरुपी अनुपस्थित राहण्याची मुभा दयावी यासाठी महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात व त्यांच्या पत्नी ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आता पुढच्या सुनावणीच्या वेळी युक्तीवाद होउन निवाडा होण्याची शक्यता आहे. पुढील सुनावणी शुक्रवार दि. १२ जानेवारीला होणार आहे.काल शुक्रवारी येथील खास न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयात हा खटला सुनावणीस आला. यावेळी मंत्री बाबुश, त्यांंच्या पत्नी जेनिफर व अन्य संशयित हजर होते. बाबुश यांना ३१ डिसेंबर पर्यंत या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अनुपस्थित राहण्याची मुभा न्यायालयाने दिली होती. ती मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा ते काल न्यायालयात हजर झाले.

२००८ साली पणजी पोलिस ठाण्यावर हल्ला झाला होता. बाबुशच्या समर्थकांना अटक केली होती. त्यांना सोडविण्यासाठी ते गेले होते.

Web Title: Application to court by wife of minister for permanent absence from hearing of case in panjim goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.