गोवा महिला आयोगावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 08:59 PM2017-12-07T20:59:03+5:302017-12-07T20:59:47+5:30
गोवा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अॅड. शुभलक्ष्मी नाईक यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विद्या शेट तानावडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होताच सरकारने अॅड. नाईक यांची नियुक्ती जाहीर केली.
पणजी : गोवा महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अॅड. शुभलक्ष्मी नाईक यांची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विद्या शेट तानावडे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होताच सरकारने अॅड. नाईक यांची नियुक्ती जाहीर केली.
गोव्यातील महिलांवर होणारे अत्याचार, त्यांचा घरगुती छळ, त्यांच्याविरोधातील वाढता हिंसाचार या सगळ्य़ा पाश्र्वभूमीवर अनेक महिला न्याय मागण्यासाठी महिला आयोगाकडे येत असतात. त्यामुळे गोव्यातील महिला आयोग ही अत्यंत महत्त्वाची संस्था बनलेली आहे. महिला आयोगाच्या यापूर्वीच्या कामाविषयी नवे सरकार समाधानी नव्हते.
महिला व बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्वजित राणो यांनी गुरुवारी येथे पत्रकारांना सांगितले, की महिला आयोगावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती झाल्यात जमा आहे. प्रक्रिया सध्या सुरू आहे. चार दिवसांत आदेश जारी होईल. पूर्ण आयोगाची फेरचना करून नवे सदस्य लवकरच नेमले जातील. तत्पूर्वी फक्त अध्यक्षांचीच नियुक्ती होईल.
महिला व बाल कल्याण खात्याच्या कामकाजात अधिक सुसूत्रता व कार्यक्षमता आणण्यासाठी सरकारने देखरेख व उच्चधिकार समिती नियुक्त केली आहे. मंत्री राणो यांनी ह्या समितीची घोषणा केली. महिलांचा आहार व अन्य विषयातील तज्ज्ञ तथा विद्यापीठाच्या सोशल स्टडीज विभागाच्या प्रमुथ शैला डिसोझा ह्या समितीच्या उपाध्यक्ष आहेत. राज्यातील अंगणवाडी कर्मचा:यांना येत्या जानेवारीपासून सातत्याने प्रशिक्षण दिले जाईल. अंगणवाडीमधील मुलांची काळजी कशी घ्यावी तसेच गरोदर महिलांर्पयत रेशन पोहचते की नाही हे कसे पहावे याविषयी अंगणवाडी कर्मचा:यांना अधिक सतर्क केले जाईल. सध्या अशा महिलांसाठी असलेले रेशन कुठे जाते याचा कुणालाच पत्ता नाही व नीट नोंद देखील ठेवली जात नाही, असे मंत्री राणो यांनी सांगितले.
14 आदर्श अंगणवाडय़ा
बांबोळी येथे चाल्र्स कुरैय्या फाऊंडेशनने आदर्श अशी एक अंगणवाडी बांधली आहे. त्याच धर्तीवर सत्तरी, धारबांदोडा, सांगे आदी भागांमध्ये मिळून एकूण चौदा आदर्श अंगणवाडय़ा बांधल्या जातील. लोक त्यासाठी स्वत:हून गिफ्ट डीडसह जमिनी देऊ लागले आहेत. वेदांता खाण कंपनीकडून चौदा अंगणवाडय़ांचे काम सरकार करून घेईल. या अंगणवाडय़ांना शौचालये तसेच मुलांसाठी खेळण्याकरिता स्वतंत्र जागा, स्वयंपाकघर वगैरे असेल. सध्या राज्यात काही अंगणवाडय़ा अशा आहेत, ज्यांना शौचालयाची सुविधाच नाही. त्यामुळे मुलांना उघडय़ावर शौचासाठी जावे लागते. अशा अंगणवाडय़ांचे दुस:या जागेमध्ये स्थलांतर केले जाईल. चार ते सहा कोटी रुपये यावर खर्च केले जातील. सडा येथे अंगणवाडी तथा आरएनडी सेंटर उभे केले जाईल, असे राणो यांनी सांगितले.
राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सव्रेनुसार गोव्यातील सहा ते तेवीस महिन्याच्या स्तनपान करणा:या फक्त 9.1 टक्के मुलांना पोषक तत्त्वे असलेला योग्य तो आहार मिळतो. सरकारकडून दिला जाणारा आहार अनेक महिलांर्पयत योग्य प्रमाणात पोहचत नाही. ही सगळी व्यवस्था सुधारली जाईल. नवी व्यवस्था आम्ही लवकरच अंमलात आणू, असे मंत्री राणो यांनी सांगितले.