गोवा शालांत मंडळावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2018 07:13 PM2018-01-09T19:13:13+5:302018-01-09T19:16:52+5:30
गोव्याच्या शिक्षण क्षेत्रत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संस्था म्हणजे गोवा शालांत व उच्च माध्यमक शिक्षण मंडळ असून या मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर रामकृष्ण सामंत यांची नियुक्ती झाली आहे.
पणजी : गोव्याच्या शिक्षण क्षेत्रत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी संस्था म्हणजे गोवा शालांत व उच्च माध्यमक शिक्षण मंडळ असून या मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर रामकृष्ण सामंत यांची नियुक्ती झाली आहे. त्याविषयीचा आदेश सरकारने मंगळवारी सायंकाळी जारी केला. सामंत हे बुधवारी सकाळी पदाची सुत्रे स्वीकारणार आहेत.
रामकृष्ण सामंत हे अनेक वर्षापूर्वी जुनेगोवे येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य होते. नंतर ते शिक्षण खात्यात उपसंचालक बनले. सरकारने अलिकडेच शालांत व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्षपदी डॉ. उदय गावकर यांची नियुक्ती केली. तत्पूर्वी शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांच्याकडे काही महिने मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त ताबा होता. उपाध्यक्षपदी डॉ. गावकर यांची नियुक्ती झाल्यानंतर अध्यक्षपदाचा ताबा भट यांनी सोडला होता. मंगळवारी सामंत यांची शिक्षण खात्यातून बदली करून मंडळाच्या चेअरमनपदी नियुक्ती करणारा आदेश शिक्षण खात्याचे संचालक व सरकारचे पदसिद्ध संयुक्त सचिव या नात्याने जी. पी. भट यांनी जारी केला. भट यांच्याच उपस्थितीत सामंत हे बुधवारी सुत्रे स्वीकारून काम सुरू करतील. सामंत यांची नियुक्ती चार वर्षासाठी झाली आहे. 2क्21 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येईल. यापूर्वी गोवा शालांत मंडळाचे चेअरमन म्हणून जे. एस. रिबेलो यांनी काम केले. पूर्वी एल. एम. फर्नाडीस तसेच पांडुरंग नाडकर्णी आदींनी हे पद भुषविले आहे. रिलेबो यांच्या निवृत्तीनंतर मंडळाचा पूर्णवेळ अध्यक्ष मिळाला नव्हता.
दरम्यान, राज्यात नव्या प्राथमिक शाळा सुरू करण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांकडून एकूण 48 अर्ज शिक्षण खात्याकडे सादर झाले आहेत. यात कोंकणी माध्यमाच्या वीस, मराठी माध्यमाच्या अकरा व इंग्रजी माध्यमाच्या नऊ शाळांसाठीच्या अर्जाचा समावेश आहे. या शिवाय उर्दू भाषेतील सात आणि सिंधी भाषेतील एक शाळा सुरू करण्यासाठी प्रथमच अर्ज सादर झाला आहे. शिक्षण खाते येत्या महिन्यात या अर्जाविषयी निर्णय घेणार आहे.
सरकारने सायबर एज योजनेखाली 32 हजार 500 लॅपटॉपांचे आतार्पयत बारावीच्या विद्याथ्र्यामध्ये वितरण केले आहे. गेल्यावर्षी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाही याच वर्षी लॅपटॉप मिळाले आहेत. आणखी साडेचार हजार लॅपटॉप येत्या 12 रोजी गोव्यात आणून ते वितरित केले जातील, असे शिक्षण संचालक भट यांनी लोकमतला सांगितले.