मांद्रे पोलिस स्थानक निरीक्षकपदी शेरीफ जॅकीस यांची नियुक्ती
By पूजा प्रभूगावकर | Published: December 29, 2023 07:19 PM2023-12-29T19:19:37+5:302023-12-29T19:19:53+5:30
याबाबतचा आदेश पणजी पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकेअर यांनी जारी केला आहे.
पणजी: नव्याने स्थापन केलेल्या मांद्रे पोलिस स्थानकाच्या निरीक्षकपदी पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांची नियुक्ती सरकारने केली आहे.
पोलिस निरीक्षकसह मांद्रे पोलिसस्थानकात ३६ पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात १ पोलिस उपनिरीक्षक,३ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक, ६ हेड कॉन्स्टेबल , २२ पोलिस कॉन्स्टेबल व ३ महिला पोलिस कॉन्स्टेबलांचा समावेश आहे. याबाबतचा आदेश पणजी पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक नेल्सन आल्बुकेअर यांनी जारी केला आहे.
पोलिस निरीक्षक शेरीफ जॅकीस यांच्याकडे दाबोळी विमानतळ पोलिसस्थाकडे निरीक्षकपदाची जबाबदारी होती. त्यांची मांद्रे पोलिस निरीक्षकपदी नियुक्ती झाल्याने दाबोळी विमानतळ पोलिसस्थाक निरीक्षकपदी अरुण बाक्रे यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी मांद्रे हे पेडणे पोलिसस्थानकाच्या हद्दीत येत होते. मांद्रे मतदारसंघाला स्वतंत्र्य पोलिसस्थानक असावे अशी तेथील लोकांची बऱ्याच वर्षांपासून मागणी होती.