1914 पासूनचे सगळे जन्म-मृत्यू दाखले पुरातत्त्व खात्यात नेण्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:16 PM2020-05-04T13:16:59+5:302020-05-04T13:17:09+5:30
कायदा खात्याकडून अधिसूचना जारी
पणजी : 1914 ते 1970 पर्यंतच्या कालावधीतील सगळे जन्म व मृत्यू विषयक दाखले, प्रमाणपत्रे तसेच त्या कालावधीतील सगळे जुने दस्ताऐवज राज्यातील सर्व संबंधित सिव्हील रजिस्ट्रार तथा सब-रजिस्ट्रार कार्यालयांमधून गोवा सरकारच्या पुरातत्त्व खात्यात हलविण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. त्याविषयीची अधिसूचना कायदा खात्याने जारी केली आहे.
अनेक सब-रजिस्ट्रार कार्यालयांमध्ये अजून 1914 ते 1970 पर्यंतच्या कालावधीतील रेकॉड्स उपलब्ध आहेत. जुने रजिस्टर ऑफ रेकॉड्स आहेत. तसेच जन्म व मृत्यूविषयीची प्रमाणपत्रे आहेत. ही सगळी कागदपत्रे पणजीच्या आर्काव्हज ऍण्ड आर्किओलॉजी या खात्यात आता हलविली जातील. या आदेशाद्वारे यापुढे जन्मृ मृत्यूचे दाखले जरी पुरातत्त्व खात्यात हलविले गेले तरी, लोकांना सध्याच्याच प्रक्रियेनुसार सब-रजिस्ट्रार कार्यालयांकडूनच 1914 ते 70 च्या कालावधीतील जन्म- मृत्यू दाखले दिले जातील. त्यामुळे लोकांनी या दाखल्यांसाठी पणजीत पुरातत्त्व खात्याकडे जाण्याची गरज नाही असेही कायदा खात्याच्या आस्थापन विभागाचे अव्वल सचिव अमिर परब यांनी अधिसूचनेत म्हटले आहे. पुरातत्त्व खाते जी प्रमाणित प्रत उपलब्ध करील, ती प्रत नोंदणी खात्याकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केली जाईल, असेही अधिसूचनेतून स्पष्ट करण्यात आले आहे. ही अधिसूचना राजपत्रत प्रसिद्ध झाली आहे.
सर्व लोकांना जलदगतीने जन्म व मृत्यूचे दाखले मिळावेत म्हणून या दाखल्यांची प्रत नोंदणी खात्याने सेंट्रल सर्वर किंवा स्टेट रिपोङिाटरीवर उपलब्ध करावेत असेही कायदा खात्याने सूचविले आहे. नोंदणी अधिका:यांनी सेंट्रल सर्वरवरून असे दाखले डाऊनलोड करून घ्यावेत असेही कायदा खात्याचे म्हणणो आहे. कोणत्याही भागातील लोकांना अशा पद्धतीने लवकर दाखले मिळायला हवेत असा कायदा खात्याचा हेतू आहे.