आराध्य दैवत श्री. शांतादुर्गा कुंकळ्ळीकरणीवर आक्षेपार्ह टिप्पणी: गावकरी एकवटले: संशयितांवर गुन्हा नोंद
By सूरज.नाईकपवार | Published: May 19, 2024 06:15 PM2024-05-19T18:15:43+5:302024-05-19T18:16:07+5:30
पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.
मडगाव: गोव्यातील कुंकळनळी गावातील कुंकळ्ळीकारांचे आराध्य दैवत श्री. शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने गावकरी संतप्त झाले असून, सर्व गावकऱ्यांनी आज रविवारी कुंकळ्ळी पोलिस ठाणे गाठून संशयितांना त्वरीत अटक करावी अशी एकमुखी मागणी केली आहे. या प्रकरणी श्री. शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण संस्थान फातर्पा देवास्थान समितीचे अध्यक्ष कवेंद्र देसाई यांनी पोलिसांत तक्रार नोंद केली असून, या तक्रारीची त्वरीत पोलिसांनी दखल घेउन सामाजिक कार्यकर्ता श्रेया धारगळकर, नमिता फातर्पेकर व अभिषेक नाईक या तिघांवर गुन्हा नोंद केला आहे. संतप्त गावकऱ्यांनी संशयितांना अटकेची मागणी करीत दुपारी बाजारपेठही उत्स्फुतेने बंद ठेवली. संशयितांविरोधात पोलिसांनी भादंसंच्या १५३, १५३ (अ) ,२९५ (अ) , २९८ ,५०० व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ( अ) अंतर्गंत गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत.
कवेंद्र देसाई यांनी आपल्या तक्रारीत संशयितांनी देवालय संबधी खोटी व बदनामीकारक संदेश सोशल मिडियावर व्हायरल केला. त्यामुळे देवस्थान समिती व सदस्यांच्या धार्मिक भावना दुखाविल्या गेल्या आहेत. तसेच संशयित धारगळकर यानी अर्वाच्या भाषा वापरुन हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
मागाहून पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी आमच्या देवालयाचा इतिहास सर्वज्ञात आहे. काही सेवेकरी आता मालक म्हणून दावा करतात, नमिता फातर्पेकर जी जागेसंबधी आपली सतावणुक करीत असल्याचा आरोप करीत आहेत तो आरोप निराधार आहे. तीच्याकडे मालकी हक्कासंबधीचे कुठलाही कागदपत्रकी पुरावा नाही. पुरावा असेल तर तो तिने संबधीत अधिकाऱ्याकडे सादर करावा असे म्हटले आहे.