अर्जुन, जान्हवीसोबत चित्रपट दिग्दर्शित करणार : बोनी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 07:27 PM2018-11-22T19:27:00+5:302018-11-22T19:27:10+5:30

भविष्यात अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर यांना सोबत घेऊन चित्रपटाची निर्मिती करेन आणि त्यांच्यासाठी दिग्दर्शनही करेन, अशी घोषणा निर्माता, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी बुधवारी गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केली.

Arjun, Jannahvi will direct the film: Boney Kapoor | अर्जुन, जान्हवीसोबत चित्रपट दिग्दर्शित करणार : बोनी कपूर

अर्जुन, जान्हवीसोबत चित्रपट दिग्दर्शित करणार : बोनी कपूर

Next

- संदीप आडनाईक
पणजी : भविष्यात अर्जुन कपूर आणि जान्हवी कपूर यांना सोबत घेऊन चित्रपटाची निर्मिती करेन आणि त्यांच्यासाठी दिग्दर्शनही करेन, अशी घोषणा निर्माता, दिग्दर्शक बोनी कपूर यांनी बुधवारी गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये केली. कर्न्व्हसेशन वुईथ कपूर्स या मास्टर क्लास कार्यक्रमात बोनी कपूर आणि जान्हवी कपूर हे बापबेटी उपस्थित होते.

अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या बोनी कपूर यांनी घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी अभिनय सोडावा लागला आणि निर्मिती क्षेत्रात उतरावे लागल्याची कबुली देत भविष्यात कपूर कुटुंबीयांना घेऊन एखादा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन रसिकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिले. या चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांना आणि त्यांच्या मुलांच्याही भूमिका असतील, असे बोनी कपूर म्हणाले. अनिल कपूर, संजय कपूर या दोघांच्याही मुलांचा समावेश या चित्रपटात असेल आणि त्यांच्यासाठी मी दिग्दर्शन क्षेत्रातही पुनरागमन करेन, असे ते म्हणाले.

राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर, बी. आर. चोप्रा. यश चोप्रा, आदित्य चोप्रा यांच्याप्रमाणेच बोनी कपूर,अनिल कपूर आणि संजय कपूर या कपूर घराण्यातील त्रिमूर्ती चित्रपट क्षेत्रात प्रसिध्दीच्या शिखरावर आहेत, अशा शब्दात कपूर्ससोबत कला अकादमीत भरगच्च गर्दीत मास्टर क्लास रंगला. निर्माते राहुल रवैल यांच्यामुळे हा कार्यक्रम घडून आल्याचे मत मुलाखतकारांनी मांडले. या वेळी बोनी कपूर यांनी तांबे युग, चंदेरी युग, सुवर्ण युग आणि आता हीरकयुग सुरू असल्याचे सांगून पूर्वीपेक्षा या क्षेत्रात काम करण्याच्या अनेक पध्दती बदलल्याचे सांगितले.

पूर्वी ५0-६0 सिनेमाघरात चित्रपट प्रदर्शित होत होते, आज ठग्ज आॅफ हिंदुस्थानसारखा चित्रपट ७000 सिनेमाघरात प्रदर्शित झाला आणि चीनमध्येही प्रदर्शित होतोय, असे सांगून भानू अथैय्या, ए. आर. रेहमान, रस्सूल पकूटी यांची उदाहरणे देत भारतीय सिनेमा तांत्रिकदृष्ट्या आॅस्करच्या तुलनेत सुरुवातीपासूनच वरचढ असल्याचे सांगितले. सहाय्यक एडिटर, सहाय्यक दिग्दर्शक अशा भूमिकेतून निर्माता झालो. अभिनयाचा प्रांत अनिल कपूरसाठी सोडल्याचे सांगून कपूरांची नवी शाखा आता सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
लेखकांसाठी आवाहन
बोनी कपूर यांनी पूर्वीही लेखकांची बॉलिवूडला गरज होती, आणि आजही आहे असे सांगून लेखकांना कथासंकल्पना पाठविण्याचे आवाहन केले. उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी इंटरनेटच्या माध्यमातून निर्माते, दिग्दर्शकांशी लेखकांनी संपर्क साधावा. चांगल्या संकल्पनेवरील कथानकावर चित्रपट काढता येईल, असे आवाहन बोनी कपूर यांनी केले.
अर्जुन कपूरसाठी माफी
अर्जुन कपूर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होता, मात्र त्याच्या पानिपत या चित्रपटातील त्याचा लूक जाहीर होउ नये, यासाठी त्याचे दिग्दर्शक प्रयत्न करत आहेत. इन्स्टाग्रामवरही तो चेहरा लपवून फिरत असल्याचे पोस्ट पडली असल्याचे सांगून बोनी कपूर यांनी अर्जुन कपूरच्यावतीने माफी मागितली.
श्रीदेवीच्या आठवणीने बापबेटी भावुक
श्रीदेवीचा उल्लेख या मुलाखतीत येणे साहजिकच होते. जान्हवी कपूर आणि बोनी कपूर दोघेही त्यांच्या आठवणीने भावविवश झाले. जान्हवी कपूरने तिच्यावर केलेली कविता सादर करुन तिच्याप्रमाणे अभिनयाच्या क्षेत्रात नाव कमावू आणि स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करु असे सांगितले. आईच्या मृत्यूनंतर आमचा परिवार एक झाल्याचे तिने सांगितले, तर बोनी कपूर यांचा स्वर श्रीदेवीबद्दल बोलताना जडावला. ३0 वर्षात ३0 चित्रपट तिने केल्याचे सांगून सुनहरा संसार आणि ज्यूली चित्रपटात तिने बाल कलाकार म्हणून काम केल्याचे सांगितले. तिन पिढ्यांसोबत तिने काम केल्याचे बोनी कपूर यांनी आवर्जुन सांगितले. ती सुपरस्टार होती. मॉमसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण तिच्या हयातीत तो पुरस्कार मिळायला हवा,अशी खंतही व्यक्त केली.

Web Title: Arjun, Jannahvi will direct the film: Boney Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.