आरनॉल्ड यांच्या खून्याला पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 03:09 PM2024-07-17T15:09:42+5:302024-07-17T15:10:06+5:30
- काशिराम म्हांबरे लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा: कांदोळी-ओर्डा येथील आरनॉल्ड सुवारीस यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित अरविंद ...
- काशिराम म्हांबरे
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हापसा: कांदोळी-ओर्डा येथील आरनॉल्ड सुवारीस यांच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेला संशयित अरविंद राजू पवार याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलेली. त्यानंतर कळंगुट पोलिसांच्या विशेष पथकाने कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने संशयिताना कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या सिमेवर अटक केली होता. त्यानंतर मंगळवारी रात्री हे पथक संशयिताला सोबत घेऊन गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर आज त्याला रिमांडसाठी न्यायालया समोर हजर करण्यात आले होते. उद्या त्याच्या रिमांडात वाढ करण्यासाठी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
संशयित हा मयताच्या घरी घरगडी म्हणून कामाला होता. त्यामुळे त्याचे तेथे येणे जाणे होते. घटनेच्या दिवशी तेथे चोरी करण्याच्या उद्देशाने संशयिताने घराची कौले काढून आता प्रवेश मिळवला होता. तशी माहिती त्यांनी पोलिसांना तपासा दरम्यान दिली.
घरात प्रवेश केल्यानंतर मयत उठल्याने दोघातही झटापट झाली. त्यानंतर अवजड वस्तूचा वापर करुन मयताचा खून केला होता. खून करण्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार पोलिसांना सापडले नव्हते. तसेच खून करण्यास त्याच्या सोबत त्याचे इतर साथीदार होते का याची पडताळी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.