कारागृहातील कैद्याकडून अधिक्षकांना अटकाव अन् धमकी; गुन्हा दाखल
By काशिराम म्हांबरे | Published: May 18, 2024 04:15 PM2024-05-18T16:15:28+5:302024-05-18T16:15:38+5:30
अधिक्षकाने भगत याला कोठडीतील ब्लॉक २ यातून ब्लॉक ४ यात हलवण्याचे आदेश दिले होते.
म्हापसा - कोलवाळ येथील केंद्रीय कारागृहाचे अधीक्षक शंकर गांवकर यांना अटकाव करून धमकी दिल्या प्रकरणी अंडर ट्रायल कैदी तसेच कुविख्यात गुंड विकट भगत यांच्या विरुद्ध कोलवाळ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या संबंधी अधीक्षक गांवकर यांनी तक्रार दाखल केली होती. गुंड विकट भगत याच्या विरोधात अतिरिक्त सत्र न्यायालय मडगांव, जलद गती न्यायालय म्हापसा तसेच राज्यातील इतर न्यायालयात सुनावण्या प्रलंबीत आहेत.
सदर घटना १५ में रोजी संध्याकाळच्या वेळेला घडली होती. अधिक्षकाने भगत याला कोठडीतील ब्लॉक २ यातून ब्लॉक ४ यात हलवण्याचे आदेश दिले होते. दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी सुरु असताना भगत यांनी इतर कैद्यांच्या मदतीने अधिक्षकांना अटकाव करून त्यांना धमकी दिली. घडलेल्या प्रकारानंतर अधिक्षकांनी तक्रार दाखल केली. करण्यात आलेली तक्रार भारतीय दंड संहितेच्या कलम १८६ तसेच ५०६ (२) अंतर्गत नोंद करून घेण्यात आली आहे. पुढील तपास काऱ्य निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.