बलात्कार करुन फरार झालेल्या दिल्लीतील युवकाला काणकोणात अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 16:48 IST2019-04-19T16:47:04+5:302019-04-19T16:48:08+5:30

2 डिसेंबर 2018 रोजी सदर संशयिताने दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद झाला होता.

Arrested in rape and gang rape in Delhi, goa person | बलात्कार करुन फरार झालेल्या दिल्लीतील युवकाला काणकोणात अटक

बलात्कार करुन फरार झालेल्या दिल्लीतील युवकाला काणकोणात अटक

मडगाव : दिल्ली येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नंतर गोव्यात आसरा घेतलेल्या कोमल कैलाश कुमार या तरुणाला दिल्ली पोलिसांनी काणकोण पोलिसांच्या सहाय्याने आगोंद-काणकोण येथे अटक केली. तीन महिन्यापूर्वी हा गुन्हा करुन सदर तरुण दिल्लीतून फरार झाला होता अशी माहिती काणकोण पोलिसांनी दिली.

2 डिसेंबर 2018 रोजी सदर संशयिताने दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा त्याच्यावर नोंद झाला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. सदर संशयित किंदळे-काणकोण या भागात रहात असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या सहाय्याने त्याला अटक केली. सदर तरुण मागचे तीन महिने आगोंद येथे सुतार काम करत होता अशी माहिती प्राप्त झाली आहे. या संशयितावर भादंसंच्या 376 व 366 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती काणकोणचे पोलीस निरीक्षक सुदेश नार्वेकर यांनी दिली.

Web Title: Arrested in rape and gang rape in Delhi, goa person

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.