चार कोटींहून अधिक सुवर्णलंकार चोरणारी चौकडी जेरबंद; कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

By सूरज.नाईकपवार | Published: July 3, 2023 04:43 PM2023-07-03T16:43:48+5:302023-07-03T16:44:29+5:30

महाराष्ट व कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने कोकण रेल्वे पोलिसांनी या धाडसी चोरीचा अखेर पर्दाफाश करताना चोरटयांना गजाआड केले.

arrested who stole more than 4 crore gold action of konkan railway police | चार कोटींहून अधिक सुवर्णलंकार चोरणारी चौकडी जेरबंद; कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

चार कोटींहून अधिक सुवर्णलंकार चोरणारी चौकडी जेरबंद; कोकण रेल्वे पोलिसांची कारवाई

googlenewsNext

सूरज नाईक पवार, लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : गोव्याच्या कोकण रेल्वे पोलिसांनी धावत्या रेल्वेतून चार कोटीहून अधिक सुवर्णलंकाराची चोरी करणाऱ्या चौकडीला जेरंबद केले आहे. संदीप भोसले (४०, सांगली) , अक्षय चिनवाल (२८, खानापूर बेळगाव) , अर्चना उर्फ अर्ची मोरे ( नवी मुंबई, ४२) व धनपत बेड (४४, मुंबई) असे संशयितांची नावे आहेत. महाराष्ट व कर्नाटक पोलिसांच्या सहकार्याने कोकण रेल्वे पोलिसांनी या धाडसी चोरीचा अखेर पर्दाफाश करताना चोरटयांना गजाआड केले.

कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे उपअधिक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वरील कामगिरी केली.२ मे रोजी काणकोण रेल्वे स्थानकावर चोरीची वरील घटना घडली होती. मूळ मुंबईतील नागपाडा येथील अशोक आर हे तक्रारदार आहेत. ते मुंबई येथील मधु ओनामेन्टस मध्ये ऑफिस बॉय म्हणून कामाला आहे. आपले कर्मचारी संपत जैन यांचे चार कोटी रुपये किमंतीचे सात किलो सोने ( बांगडया) ट्रॉली बॅग मध्ये घेउन ते पनवेलहून तिरुवनतपुरम येथे गांधीधाम तिरुनवेली हमसफर सुपर फास्ट रेल्वेतून प्रवास करीत होते. काणकोण येथे क्रॉसिंगमुळे रेल्वे थांबली असता, त्याचे सुवर्णलंकार चोरीला गेले होते.

या प्रकरणी मागाहून पोलिसांत तक्रार नोंद झाल्यानंतर कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस अधिक्षक गुरुदास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक गुरुदास कदम, पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासकामाला सुरुवात केली होती. पोलिसांनी सांगली येथे जाउन संदीप भोसले व अक्षय चिनवाल यांच्या मुसक्या आवळल्या. २८ जून रोजी पोलिसांनी वरील कारवाई केली. संशयिताकडील दोन महारगडया कार व दाेन मोबाईल जप्त करण्यात आले. नंतर त्यांना गोव्यात आणून काणकोणच्या प्रथमवर्ग न्यायालयापुढे उभे केले असता, त्यांना सात दिवस पोलिस कोठडी देण्यात आली नंतर अर्चना हिला ताब्यात घेण्यासाठी पाेलिसांनी एक पथक तयार करुन मुंबई गाठले व तेथील ओशिवरा पोलिसांच्या मदतीने तीला अटक केली व नंतर तिचा साथिदार धनपत याच्याही मुसक्या आवळल्या. चौकशीत अर्चनाहिने मालाची डिलिव्हरी कुठल्या रेल्वेतून व कुठल्यावेळी होणार याची खबर संशयितांना दिलीहोती हे उघड झाले. पोलिसांनी संशयितांकडून १ हजार ९०० ग्राम सोने जप्त केले आहे. त्याची किमंत १ कोटी असून, ५० हजार रोखही जप्त केले आहे.संशयितांना अधिक तपासासाठी काणकोणच्या प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले असता, त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: arrested who stole more than 4 crore gold action of konkan railway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.