तुला साहेबांचा फोन येणार, बाऊन्सरची धमकी; आसगाव घर मोडतोड प्रकरणात अर्शद ख्वाजाचे कारनामे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2024 01:01 PM2024-07-03T13:01:52+5:302024-07-03T13:02:11+5:30

अर्शद ख्वाजा दादागिरी करत तर होताच, परंतु पोलिसांचीही त्याला भीती नव्हती.

arshad khwaja exploits revealed in asgaon house breaking case | तुला साहेबांचा फोन येणार, बाऊन्सरची धमकी; आसगाव घर मोडतोड प्रकरणात अर्शद ख्वाजाचे कारनामे उघड

तुला साहेबांचा फोन येणार, बाऊन्सरची धमकी; आसगाव घर मोडतोड प्रकरणात अर्शद ख्वाजाचे कारनामे उघड

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: घराची मोडतोड प्रकरणात बाऊन्सरांचा मोरक्या मुख्य बाऊन्सर अर्शद ख्वाजा हा थेट पोलिस निरीक्षकालाच धमकी देत होता, असे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सांगतात. त्यांच्या मोडतोड करण्याच्या कामात अडथळे आणू नका, साहेबांचाच तुम्हाला फोन येणार आहे, असेही तो सांगत होता.

अर्शद ख्वाजा दादागिरी करत तर होताच, परंतु पोलिसांचीही त्याला भीती नव्हती. निरीक्षकालाही त्याने सांगितले होते की तुमच्या साहेबांचा तुम्हाला फोन येणार आहे. ख्वाजाच्या उपस्थितीतच घराची मोडतोड करण्यात आली होती. इतर बाऊन्सरना तोच सूचना देत होता. या प्रकरणात त्याला एसआयटीकडून पकडून आणल्यानंतरही त्याचा तोरा कायम होता. मंगळवारी त्याला न्यायालयाने सशर्त जामिनावर मुक्त केले आहे.

पूजाच्या जामिनाला विरोध

आसगाव प्रकरणात मूख्य सूत्रधार असलेली मुंबईस्थित पूजा शर्मा हिने एसआयटीचे समन्स धुडकावून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आज, बुधवारी तिच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. दरम्यान, एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीकडून तिला जामीन देण्यासाठी तीव्र हरकत घेतली जाणार आहे. बुधवारी पोलिस आपले प्रतिज्ञापत्रही न्यायालयात सादर करणार आहेत.

संशयितांना जामीन

आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांच्या घराची मोडतोड केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित एजंट अर्शद ख्वाजा याच्यासह कारचालक अश्पाक शेख व तीन महिला बाऊन्सरांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. काल, मंगळवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. कारचालक अश्पाक शेख तसेच तीन महिला बाऊन्सरना २० हजार रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला.
 

Web Title: arshad khwaja exploits revealed in asgaon house breaking case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.