राज्यात १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कला आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन

By समीर नाईक | Published: February 3, 2024 03:44 PM2024-02-03T15:44:05+5:302024-02-03T15:44:25+5:30

लोकप्रिय गोवा कला आणि साहित्य महोत्सवाची (जीएएलएफ) १२ वी आवृत्ती १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे होणार आहे.

Art and literature festival organized in the state from 15th to 17th February | राज्यात १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कला आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन

राज्यात १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान कला आणि साहित्य महोत्सवाचे आयोजन

पणजी: लोकप्रिय गोवा कला आणि साहित्य महोत्सवाची (जीएएलएफ) १२ वी आवृत्ती १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान इंटरनॅशनल सेंटर गोवा (आयसीजी) येथे होणार आहे. लेखक आणि कवींच्या प्रभावी पंक्तीत प्रख्यात टोरंटोस्थित फूड विषयावरील लेखिका नाओमी डुगुइड, अग्रगण्य फ्रँको-भारतीय कादंबरीकार अरी गौटियर यांच्यासह देविका रेगे, सोहिनी चट्टोपाध्याय, योगेश मैत्रेय, मनीष गायकवाड आणि अभिषेक चौधरी यांचा समावेश आहे. 

तसेच मीना कंडासामी, मुस्तनसीर दळवी , रणजीत होस्कोटे आणि राष्ट्रीय साहित्यिक आय. ॲलन सीली, मामंग दाई, केआर मीरा, रॉबिन नगंगोम, विवेक शानभाग आणि मिनी कृष्णन यांचा समावेश आहे. 

१५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता आयसीजी येथे जीएएलएफ २०२४ चे उद्घाटन सागर नाईक मुळे यांच्या अधिकृत फेस्टिव्हल आर्टवर्कच्या अनावरणासह, दामोदर मावजो यांच्या ‘बॉय अनलव्हड' या जेरी पिंटो यांनी भाषांतरीत केलेल्या कादंबरीचे लाँच आणि रॉबिन नगंगॉम यांच्या कविता वाचनाने केले जाईल.

१७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वाजता अंतिम कार्यक्रमात परवेश जावा यांच्या नेतृत्वाखालील जॉन टॅवेनरचे प्रसिद्ध ट्रिब्यूट टू कॅव्हफी सादर करताना दिसेल. सर्व कार्यक्रम विनामूल्य आणि लोकांसाठी खुले आहेत.

Web Title: Art and literature festival organized in the state from 15th to 17th February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा