अरुणा गोव्यात दाखल, विष्णू वाघांवर रविवारी अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 09:33 PM2019-02-15T21:33:30+5:302019-02-15T21:33:45+5:30
अरुणा वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी गोव्यात आगमन झाले.
पणजी : अरुणा वाघ यांचे दक्षिण आफ्रिकेतून शुक्रवारी गोव्यात आगमन झाले. आपले दिवंगत पती विष्णू वाघ यांचे शव रविवारी पोहचेल व रविवारीच त्यांच्या शवावर अंत्यसंस्कार केले जातील, असे श्रीमती वाघ यांनी जाहीर केले. तसेच दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये डॉक्टरांनी वाघ यांचे निधन जाहीर केले तेव्हा आम्ही हांगरलो व मला तर तीन दिवस शुद्धच नव्हती, असा दावा अरुणा वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
8 फेब्रुवारीलाच सायंकाळी पावणो सहा वाजता वाघ यांचे निधन झाले, असे अरुणा यांनी म्हटले आहे. वाघ यांच्या इच्छेप्रमाणो आम्ही प्रथम ऑक्टोबर महिन्यात 1क् दिवसांसाठी दक्षिण आफ्रिकेला गेलो होतो. जोहान्सबर्गमध्ये फिरताना वाघ यांना खूप आनंद वाटला. त्यावेळी येताना दुबईत पण आम्ही थांबलो होतो. अलिकडे मणिपाल इस्पितळात वाघ दोन महिने होते. तीनवेळा त्यांना आयसीयूत ठेवण्यात आले होते. कुठे तरी दूर जाऊया अशी इच्छा वाघ यांनीच व्यक्त केली होती. डॉक्टरांच्या सल्ल्याने आम्ही पुन्हा जोहान्सबर्गला गेलो. माङयासोबत माझी बहीण व वाघ यांचा केअर टेकर होता. डॉक्टरांनी दीड वर्षापूर्वीच वाघ यांच्या जगण्याविषयी जास्त अपेक्षा ठेवू नका असा सल्ला मला दिला होता, असे अरुणा यांनी म्हटले आहे. निधनानंतर दोन-चार दिवस काय करावे ते आम्हाला काही कळले नाही. शवागारात प्रेत ठेवले होते. मंगळवारी आम्ही भारतीय दुतावासाला भेट दिली व गोव्यातील व जोहान्सबर्गच्या डॉक्टरांच्या कागदपत्रंप्रमाणो आम्ही सोपस्कार ऑनलाईन पद्धतीने पुढे नेले. वाघ यांचे पार्थिव रविवारी गोव्यात दाखल होईल. ढवळी येथील आमच्या निवासस्थानी सकाळी आठ वाजल्यापासून पार्थिव अंत्यदर्शनासाठी खुले असेल, असे अरुणा यांनी म्हटले आहे.