मद्य घोटाळा प्रकरणी ईडीचे चौथे समन्स चुकवीत अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

By किशोर कुबल | Published: January 18, 2024 09:16 PM2024-01-18T21:16:47+5:302024-01-18T21:17:02+5:30

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हेही गोव्यात आले आहेत.

Arvind Kejriwal in Goa after defying ED's fourth summons in liquor scam case | मद्य घोटाळा प्रकरणी ईडीचे चौथे समन्स चुकवीत अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

मद्य घोटाळा प्रकरणी ईडीचे चौथे समन्स चुकवीत अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

पणजी : दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी ईडीने बजावलेले चौथे समन्स चुकवीत आम आदमी पक्षाचे सर्वसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सायंकाळी गोव्यात दाखल झाले. त्यांच्या सोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान हेही गोव्यात आले आहेत. सायंकाळी मोपा विमानतळावर दोघांचे आगमन झाले.

ईडीच्या समन्सबद्दल पत्रकारांनी विचारले असता भगवंत सिंग मान म्हणाले कि,‘ ईडीने आपले काम करु दे, आम्ही आमचे काम करतोय.’
ईडीने केजरीवाल यांना आज १८ रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स बजावले होते. यापूर्वी तीन समन्सकडे केजरीवाल यांनी असेच दुर्लक्ष केले. समन्स बेकायदेशीर असल्याचा त्यांचा दावा आहे. २१ डिसेंबर रोजी उपस्थित राहण्यासाठी ईडीने समन्नस बजावले तेव्हा ते पंजाबमध्ये होशियारपूर येथे विपश्यनेसाठी गेले. मद्य घोटाळा प्रकरणी ईडीचे अधिकारी मनी लॅांडरिंगच्या दिशेने तपास करीत आहे व त्यांना केजरीवाल यांची जबानी हवी आहे.

या पूर्वी ११ जानेवारी रोजी त्यांचा गोवा दौरा ठरला होता परंतु दिल्लीत प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीनिमित्त त्यांनी तो लांबणीवर टाकला होता. अखेर आज ते गोव्यात दाखल झाले. दरम्यान, केजरीवाल लोकसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस ते गोव्यात असतील. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंग मान तसेच राज्यसभा खासदार राजीव छड्डा व संदीप पाठक हेही त्यांच्यासोबत या दौय्रात असतील.

गोव्यात आम आदमी पक्षाचे वेंझी व्हिएगश व क्रुझ सिल्वा हे दोन आमदार आहेत. केजरीवाल दोन्ही आमदार पक्षाचे नेते, तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यासाठी दोन तर दक्षिण गोव्यात तीन इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाकडे आलेली आहेत. पक्षाचे स्थानिक नेते  ‘इंडिया’ आघाडीबाबत गोव्यातील चित्र स्पष्ट होण्याची वाट पहात आहेत.

Web Title: Arvind Kejriwal in Goa after defying ED's fourth summons in liquor scam case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.