लोकोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग; सुट्टीचा दिवस असल्यानेही लोकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 04:47 PM2024-02-04T16:47:59+5:302024-02-04T16:49:03+5:30
येथे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांनी गर्दी वाढली हाेती.
नारायण गावस -
पणजी: पणजीतील कलाअकादमी जवळील दर्यासंगमावर लोकोत्सवाचा आज शेवटचा दिवस असल्याने खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली. सुट्टीचा दिवस असल्याने तसेच आज सांगता होणार असल्याने राज्यभरातून माेठ्या प्रमाणात लाेकांनी येथे येऊन खरेदी केली. येथे सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांनी गर्दी वाढली हाेती.
राज्यात प्रत्येक वर्षी कला व संस्कृती खात्यामार्फत लोकाेत्सव आयोजित केला जातो. तसेच यात देशभरातील विविध राज्यांचे कलांचे सादरीकरण होत असते. त्याच प्रमाणे विविध राज्यांची दालने येथे मांडली जात असतात. यंदाच्या लाेकाेत्सवात मोठ्या प्रमाणात दालने मांडली आहेत. गेले १० दिवस लाेकांनी या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात सामानाची खरेदी केली आहे. अजूनही खरेदी लाेकांची सुरुच आहे.
खरेदीसाठी गर्दी
यंदाच्या लाेकोत्सवात करोडो रुपयांची उलाढाल करण्यात आली. लाेकांनी खास करुन विविध राज्यांचे आकर्षक अशा घरघुती शोभेच्या वस्तू खरेदी केल्या. तसेच विविध प्रकारच्या साड्या अन कपडे, घरात लागणाऱ्या लाकडी वस्तू भांडी, दिखाव्याचे साहित्य या लाेकाेत्सवात दाखल झाले हाेते. जे साहित्य राज्यात सहज मिळत नाही असे विविध साहित्य ग्राहकांनी खरेदी केले.
विविध कलांचा घेतला आस्वाद
राज्यातील लोकांना या लोकोत्सवानिमित्त विविध कलांचा आस्वाद घ्यायला मिळाला. यात राजस्थानी गुजराती, महाराष्ट्र अशा विविध राज्यांची पारंपरिक नृत्ये सादर करणारे कलाकार तसेच इतर सर्व राज्यातील कलाकार येथे आले होते. प्रत्येक राज्याचे पारंपरिक नृत्य कला गायन याचा आस्वाद लाेकांना घ्यायला मिळाला. विविध कलांचे सादरीकरण येथे करण्यात आले.