फोंड्यात मागच्या सहा महिन्यात तब्बल 82 तळीराम अडकले
By आप्पा बुवा | Published: August 17, 2023 04:36 PM2023-08-17T16:36:24+5:302023-08-17T16:37:00+5:30
मद्यपी वाहन चालकावर फोंडा वाहतूक पोलीस पूर्वीपासूनच नजर ठेवून होते.
फोंडा - बाणस्तारी येथे दारूच्या नशेत वाहन चालवून लोकांचे जीव घेण्याचे प्रकरण सरकारने चांगलेच मनावर घेतले असून ,ह्या संदर्भात फोंडा पोलीस सुद्धा सक्रिय झाले असून फोंडा परिसरात मागच्या सहा दिवसात नऊ मद्यपी वाहन चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर मागच्या सहा महिन्यात एकूण 87 लोकांवर या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला आहेत. वाहतूक विभागाचे निरीक्षक कृष्णा सिनारी यांनी सदरची माहिती दिली.
मद्यपी वाहन चालकावर फोंडा वाहतूक पोलीस पूर्वीपासूनच नजर ठेवून होते. प्रवीण गावस हे वाहतूक विभागाचे निरीक्षक असताना तर त्यांनी मद्यापी वाहन चालकांवर चांगल्याच कारवाया केल्या होत्या. मध्यरात्री सुद्धा ते आपल्या पोलिसांबरोबर नक्यानाकावर उभे राहून अल्कोमीटर द्वारे लोकांची तपासणी करत होते. कृष्णा सिनारी यांनी सदरची मोहीम पुढे चालू ठेवली आहे.
पोलिसांकडे कमी प्रमाणात अल्कोमीटर आहेत हे लक्षात येताच सरकारने त्यांना आणखी सहा अल्कोमीटर उपकरणे दिली आहेत. नवीन उपकरणांमध्ये अत्याधुनिक तांत्रिक बाबी असल्याने मद्यपी वाहन चालक आपोआपच कायद्याच्या कचाट्यात सापडत आहेत.