थर्टीफर्स्ट संपताच आयकर विभागाचे अधिकारी गोव्यात; हॉटेल्स, पब्स, रेस्टॉरंटसवर छापे
By किशोर कुबल | Published: January 2, 2024 02:08 PM2024-01-02T14:08:27+5:302024-01-02T14:08:47+5:30
एका बड्या कंपनीच्या गोव्यातील पाच ते सात आस्थापनांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या.
पणजी : गोव्यात नाताळ, नववर्षाची धामधूम संपतानाच आयकर अधिकाय्रांनी किनारी भागांमध्ये हॉटेल्स, पब्स आणि रेस्टॉरंटसवर छापासत्र सुरु केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बंगळुरुहून आयकर अधिकाय्रांची पथके दाखल झाली असून एका बड्या कंपनीच्या गोव्यातील पाच ते सात आस्थापनांवर एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या. नाताळ, नववर्षानिमित्त गोव्यात कळंगुट, बागा, कांदोळी, हरमल, मोरजी तसेच कोलवा, बेतालभाटी व अन्य किनाय्रांवर पब्स, हॉटेल्स, रेस्टॉरण्टसमध्ये मोठी गर्दी असते. आस्थापनांचे मालक आयकर चुकवत असावेत, असा संशय आयकर खात्याला असून या पार्श्वभूमीवरच या धाडी टाकल्याचा कयास आहे.
काल सोमवार सायंकाळपासून आयकर अधिकारी बड्या कंपनीच्या हॉटेल्स, पब्सची झाडाझडती घेत आहेत. मोठ्या प्रमाणात रक्कम जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे.