आसगाव घर पाडल्याचे प्रकरण तपासासाठी क्राइम ब्रॅंचकडे - मुख्यमंत्री
By किशोर कुबल | Published: June 26, 2024 03:53 PM2024-06-26T15:53:28+5:302024-06-26T15:53:41+5:30
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
किशोर कुबल, पणजी : आसगाव घर पाडल्याचे प्रकरण तपासासाठी क्राइम ब्रॅंचकडे सोपवण्यात आले आहे. उद्या गुरुवारी बांधकामांचे सर्वेक्षण होणार असून मुख्य सचिवही स्वतंत्र चौकशी करून अहवाल देणार आहेत.
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की,' या प्रकरणात जे कोणी पोलीस अधिकारी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही.'
आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबीयांचे घर पाडण्यात आल्या प्रकरणी विरोधक आक्रमक बनले आहेत. दिल्लीतील एका परप्रांतीय महिलेने बाऊन्सर्स वापरून जेसीबीने हे घर पाडले. या प्रकरणावरून संतापाची भावना पसरली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारी रात्री आसगाव येथे भेट देऊन हे घर सरकार बांधून देईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर हे प्रकरण आता क्राइम ब्रांचकडे सोपविण्यात आले आहे.