आशिष सूद गोवा भाजपचे नवे प्रभारी
By वासुदेव.पागी | Published: January 27, 2024 04:34 PM2024-01-27T16:34:48+5:302024-01-27T16:39:03+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने १५ नवीन राज्य प्रभारींची नियुक्ती केली.
वासुदेव पागी, पणजीः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने १५ नवीन राज्य प्रभारींची नियुक्ती केली असून गोव्यासाठी आशिष सूद यांची नियुक्ती झाली आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची तयारी अधिकृतपणे सुरू करताना एकूण १५ नवीन प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत. गोव्याचे भाजप प्रभारी म्हणून नियुक्त झालेले सूद हे दिल्ली येथील असून तेथील जनकपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना यावेळी उमेदवारीही मिळू शकते. त्यांनी पक्षाच्या संघटनात्मक स्वरूपाच्या अनेक जबाबदाऱ्या स्विकारल्या आहेत. गोव्यात प्रभारी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांची जम्मू - काश्मीरचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी वांहत होते.
दरम्यान गोवा भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सूद हे लवकरच गोवा भेंडीवर येणार असून पक्ष कार्यकारणीची बैठकही ते घेणार आहेत. तसेच. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून गोव्यातील परिस्थितीचा अंदाजही घेणार आहेत.
गोव्यासाठी कॉंग्रेसने यापूर्वीच आपला प्रभारी नेमला आहे. माणिकराव ठाकरे हे कॉंग्रेसचे गोव्यातील प्रभारी आहेत. गोव्यात येऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही त्यांनी घेतली आहे. आता दोन्ही पक्षांच्या प्रभाऱयांची नियुक्ती झाल्यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच डावपेचांचे युद्ध रंगणार असल्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.