गोव्यात अनुसूचित जमातींना विधानसभा आरक्षण अशक्य - रामदास आठवले

By किशोर कुबल | Published: October 10, 2023 02:01 PM2023-10-10T14:01:08+5:302023-10-10T14:01:41+5:30

आठवले यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यात अनुसूचित जातींना ५ टक्के आरक्षण व आरपीआयला महामंडळ द्यावे, अशी मागणी केली.

Assembly reservation impossible for Scheduled Tribes in Goa says Ramdas athawale | गोव्यात अनुसूचित जमातींना विधानसभा आरक्षण अशक्य - रामदास आठवले

गोव्यात अनुसूचित जमातींना विधानसभा आरक्षण अशक्य - रामदास आठवले

पणजी : गोवा भेटीवर आलेले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य विधानसभेत अनुसूचित जमातींना (एसटी) आरक्षण शक्य नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘राज्यात एसटींची संख्या अगदीच कमी आहे. याआधीही जनगणनेतून ते स्पष्ट झालेले आहे.’

आठवले यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन गोव्यात अनुसूचित जातींना ५ टक्के आरक्षण व आरपीआयला महामंडळ द्यावे, अशी मागणी केली.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना आठवले म्हणाले की,‘गोव्यात रिपब्लिकन पार्टी सरकारच्या पाठीशी आहे. आम्हाला एखादे महामंडळ दिले जावे तसेच गोव्यात अनुसूचित जातींच्या लोकांची संख्या २ टक्के असली तरी किमान ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी आम्ही केली आहे. व मुख्यमंत्र्यांनी त्यावर सहानुभूतीपूर्वक विचार करु, अशी ग्वाही दिलेली आहे.’

आठवले म्हणाले की, ‘एससींसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे. पत्रकार परिषदेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब बनसोडे,
विजय कदम, सतीश बोरगांवकर आदी उपस्थित होते.

Web Title: Assembly reservation impossible for Scheduled Tribes in Goa says Ramdas athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.