म्हापसा अर्बन बँकेकडून माजी नगरसेवकाच्या मालमत्तेचा लिलाव 

By काशिराम म्हांबरे | Published: May 10, 2023 12:08 PM2023-05-10T12:08:55+5:302023-05-10T12:09:07+5:30

कै. ऑस्कर डिसोझा यांनी दोनापावला येथील सुमारे ९, ५६० चौरस मिटर जमिन तारण ठेऊन कर्ज घेतलेले.

Auction of former corporator's property by Mhapasa Urban Bank | म्हापसा अर्बन बँकेकडून माजी नगरसेवकाच्या मालमत्तेचा लिलाव 

म्हापसा अर्बन बँकेकडून माजी नगरसेवकाच्या मालमत्तेचा लिलाव 

googlenewsNext

गेल्या तीन वर्षापासून दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जाणाऱ्या म्हापसा अर्बन बँकेने माजी नगरसेवक कै. ऑस्कर डिसोझा यांच्या मालमत्तेचा जाहिर करण्याचा निर्णय घेतला आहे.  म्हापशातील या माजी नगरसेवकाने दोनापावला येथील आपली मालमत्ता बँकेत तारण ठेऊन कर्ज घेतले होते. घेतलेले कर्ज न फेडल्याने हा लिलाव करण्याचा निर्णय बँकेच्या लिक्वीडेटराकडून घेण्यात आला आहे.

कै. ऑस्कर डिसोझा यांनी दोनापावला येथील सुमारे ९, ५६० चौरस मिटर जमिन तारण ठेऊन कर्ज घेतलेले. घेतलेले कर्ज न फेडल्याने ही वसुली केली जाणार आहे. लिलावासाठी आरक्षीत रक्कम म्हणून २ कोटी २५ लाख रुपये निश्चीत करण्यात आली आहे. आरक्षीत केलेल्या रक्कमेपेक्षा कमी किंमतीत मालमत्तेचा लिलाव बँकेकडून केला जाणार नसल्याने स्पष्ट करण्यात आले आहे.

मालमत्तेची लिलावाव्दारेखरेदी करणाºयाने निश्चीत रक्कमेतील २५ टक्के रक्कम दोन दिवसात जमा करणेबंधनकारक करण्यात आलेआहे. दरम्यान ठेवीदारांच्या ठेवींचा परतावा करण्याची पद्धत संथ गतीने सुरु असल्याने ठेवीदारांकडून  नाराजी व्यक्त केली जात आहे. अद्यापपर्यंत ५० टक्क्याहून कमी ठेवीदारांच्या ठेवींचा परतावा करण्यात आल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आला आहे.तसेच ५ लाखाहून जास्त ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याची प्रक्रिया अद्यापही सुरु करण्यात आली नसल्याचे ठेवीदार जोझफ कार्नेरो यांचे म्हणणेआहे. रिजर्व्ह बँकेने १६ एप्रिल २०२० साली बँकेचा परवाना रद्द करून दिवाळखोरीत प्रक्रिया सुरु केली होती.

Web Title: Auction of former corporator's property by Mhapasa Urban Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.