पर्यटकांशी गैरवर्तन टाळा, अन्यथा कठोर कारवाई करु! मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 10:37 AM2023-03-14T10:37:48+5:302023-03-14T10:40:29+5:30

गोव्याची बदनामी करणाऱ्या हणजुणे येथील घटनेची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे.

avoid misbehaving with tourists otherwise strict action will be taken cm pramod sawant warning | पर्यटकांशी गैरवर्तन टाळा, अन्यथा कठोर कारवाई करु! मुख्यमंत्र्यांचा इशारा

पर्यटकांशी गैरवर्तन टाळा, अन्यथा कठोर कारवाई करु! मुख्यमंत्र्यांचा इशारा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याची बदनामी करणाऱ्या हणजुणे येथील घटनेची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली आहे. गुन्ह्याची तीव्रता कमी करणारा गुन्हा नोंदविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित केले आहे. तसेच पर्यटकांना कसे हाताळावे, याविषयी हॉटेल मालकांनाही योग्य समज देण्यात आली आहे. यापुढे पर्यटकांशी दुर्व्यवहार केल्यास तुरुंगात टाकले जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

गोव्याचा पर्यटन उद्योग राखण्यासाठी गोव्याची होणारी बदनामी थांबविण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पर्यटक गोव्यात येऊन वाईट आठवणी घेऊन जाऊ नयेत. बदनामी करणारे व्हिडीओ व्हायरल करू नयेत, यासाठी पर्यटनाशी संबंधीत प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत दिरंगाई सोसून घेऊ नका, अशा सूचना दिल्या. उपनिरीक्षकाला निलंबीत करतानाच त्याच्या चौकशीचाही आदेश देण्यात आला.

हॉटेल व्यवस्थापनही जबाबदार

हणजूणच्या ज्या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला तिथे सुरुवातीला त्या पर्यटकानेही चूक केली. वेटरशी वाद झाल्यानंतर त्याने वेटरवर दगड फेकला आणि नंतर त्या वेटरने इतरांना सोबत घेऊन पर्यटकावर चाकू हल्ला केला. तेव्हाच हॉटेलच्या व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार केली असती तर पुढील अनर्थ टळला असता, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

सीएमओ किंवा डीजीपींकडे तक्रार करा

कुणा पर्यटकावर किंवा स्थानिकावरही कुठे अन्याय होत असेल आणि जर स्थानिक पोलिस आपली तक्रार ऐकत नसतील तर मुख्यमंत्री कार्यालयात किंवा पोलिस महासंचालकांकडे तक्रार करा. तत्काळ कारवाई केली जाईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

पर्यटकांचा दुसरा व्हिडीओ

आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही आयपीसी कलम ३०७ अंतर्गत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हणजूण पोलिसांनी नोंद केला नाही, असा व्हिडीओ बनविणाऱ्या पर्यटकाने आता पोलिस कारवाई झाल्यानंतर दुसरा व्हिडीओ जारी केला आहे. त्यात त्यांनी व्हिडीओची दखल घेऊन कारवाई केल्यामुळे गोवा पोलिसांना, मुख्यमंत्री तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयानेही धन्यवाद दिले आहेत.

४ हजारांवर होती बेकायदेशीर हॉटेल्स

पर्यटन खात्याकडे पूर्वी १,२०० हॉटेलची नोंदणी होती. पर्यटन खात्याने कारवाईचा बडगा उगारल्यावर आता ती संख्या ६ हजारांवर झाली आहे. ४ हजारांवर हॉटेल्स बेकायदेशीरपणे चालू होती, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

जुने गोवेच्या घटनेत पर्यटकाचीच चूक

जुने गोवे येथेही एका पर्यटकाला मारहाणीची घटना घडली होती. परंतु, या प्रकरणात पर्यटकानेच सुरुवातीला सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याचे चौकशीत आढळून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केवळ वक्तव्य नको, लोबोंनी तक्रार करावी

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनीही गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करीत नसल्याचे वक्तव्य केले होते. याविषयी विचारले असता मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मायकल यांनी तक्रार नोंदवावी, केवळ वक्तव्ये करून चालणार नाहीत, व्यवस्थित माहिती द्यावी, कारवाई केली जाईल.

विद्यार्थ्यांना डिस्टर्ब करू नका

बारावीच्या परीक्षा १५ ते ३१ मार्च या कालावधीत आहेत. त्यानंतर दहावीच्या परीक्षा सुरु होणार आहे. त्यामुळे या कालावधीत रात्री १० ला पाय बंद करा. दहा तरीही पाठ्य सुरू ठेऊन नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाईचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: avoid misbehaving with tourists otherwise strict action will be taken cm pramod sawant warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.