गोव्यात ‘आयुष’ पर्यटनास वाव

By admin | Published: May 2, 2017 04:39 AM2017-05-02T04:39:00+5:302017-05-02T04:39:00+5:30

‘आयुष’शी निगडित पर्यटन गोव्यात आकार घेईल, असे यापूर्वी गोवा सरकारलाही वाटत नसताना गोव्याचे खासदार असलेल्या केंद्रीय

'AYUSH' tourism in Goa | गोव्यात ‘आयुष’ पर्यटनास वाव

गोव्यात ‘आयुष’ पर्यटनास वाव

Next

सद्गुरू पाटील / पणजी
‘आयुष’शी निगडित पर्यटन गोव्यात आकार घेईल, असे यापूर्वी गोवा सरकारलाही वाटत नसताना गोव्याचे खासदार असलेल्या केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुष पर्यटनाला गोव्यात वाव देण्याचे ठरविले आहे.
गोव्यात अलीकडील काळात पर्यटनाचे विविध प्रकार विकसित होत आहेत. इको-टुरिझमला गोवा सरकारने वाव दिल्यानंतर अनेक महत्त्वाचे प्रकल्प इको-पर्यटन क्षेत्रात येऊ लागले आहेत. गोव्यात आयुष मंत्रालयाने अलीकडे प्रथमच जागतिक दर्जाचे प्रदर्शन आयोजित केले होते. आयुर्वेदिक औषधे, उत्पादने, त्यांचा प्रसार करणे या हेतूने हे प्रदर्शन भरविले गेले व गोव्यातील हजारो लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली.
गोव्यातील धारगळ येथे आयुष मंत्रालयाकडून ५० खाटांचे इस्पितळ उभे केले जाणार आहे. गोव्यातील अशा प्रकारचे हे पहिलेच इस्पितळ असेल. त्यासाठी भू-संपादनही झालेले आहे. प्रकल्पाचा तपशील ठरविण्यासाठी राज्य सरकारकडून आयुष मंत्रालयाशी बोलणी केली जात आहेत. आयुर्वेद, होमिओपथी, युनानी, योगा अशा विविध पद्धतींशी निगडित उपचार धारगळमधील इस्पितळात उपलब्ध असतील.
गोव्याला वार्षिक सरासरी साठ लाख पर्यटक भेट देतात. त्यात पंधरा लाख विदेशी पर्यटकांचा समावेश असतो. विदेशी पर्यटकांचा ओढा हा योग आणि आयुर्र्वेदाकडे वाढला आहे. गोव्याच्या किनारपट्टीत विदेशी पर्यटकांना योगाचे प्रशिक्षण देणारी किमान ५० केंद्रे गेल्या पाच वर्षांत उभी राहिली आहेत. काही विदेशी पर्यटक स्वत:ही योगाचे प्रशिक्षक बनले आहेत. विदेशी पर्यटक विविध प्रकारच्या व्याधींवर गोव्यात आयुर्र्वेदिक उपचार करून घेतानाही आढळून येतात.
पर्यटनमंत्री बाबू आजगावकर ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, की गोव्यात सर्वच प्रकारचे पर्यटन यापुढील काळात वाढणार आहे. एकेवेळी गोव्याला केवळ १५ लाख पर्यटक भेट द्यायचे. गोव्यात साहसी, पर्यावरणविषयक व आध्यात्मिक अशा प्रकारच्या पर्यटनाचे प्रकार १५ वर्षांपूर्वी विकसित झाले नव्हते. आता आयुषविषयक पर्यटनही विकसित होईल.

आयुष पर्यटन विकसित करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. गोव्यात नेचोरपथी संस्थाही उभी केली जाईल. आयुष पर्यटन हे वैद्यकीय पर्यटनाच्याच हातात हात घालून पुढे जाईल. गोवा ही आयुष पर्यटनासाठी अनुकूल अशी भूमी आहे. त्यासाठी आवश्यक त्या सुविधा आम्ही उपलब्ध करण्याचे प्राथमिक काम सुरू केले आहे.
- श्रीपाद नाईक, केंद्रीय आयुष मंत्री

Web Title: 'AYUSH' tourism in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.