गोव्यात बीएची पदवी आता संस्कृतमधून

By admin | Published: May 11, 2016 04:47 PM2016-05-11T16:47:00+5:302016-05-11T17:05:35+5:30

काळाच्या ओघात मागे पडलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत.

BA degree in Goa now comes from Sanskrit | गोव्यात बीएची पदवी आता संस्कृतमधून

गोव्यात बीएची पदवी आता संस्कृतमधून

Next

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. ११ - काळाच्या ओघात मागे पडलेल्या संस्कृत भाषेला पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी विविध पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. लवकरच तुम्हाला गोव्यामधून संस्कृत भाषेमधून बीएची पदवी घेता येणार आहे. गोव्याच्या कुंदायम मठाच्या श्री ब्रम्हानंद संस्कृत प्रबोधिनीला संस्कृतमधून बीएची पदवी देण्यासाठी गोव्याच्या उच्च शिक्षण महासंचालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे. 
 
गोव्यामध्ये प्रथमच पदवीसाठी संस्कृतचा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. श्री ब्रम्हानंद संस्कृत प्रबोधिनीने दिलेला प्रस्ताव आता गोवा विद्यापीठ तपासणार आहे. गोवा विद्यापीठाचे संलग्नतेचे निकष पूर्ण केल्यास मान्यता मिळू शकते. गोवा विद्यापीठाची मान्यता मिळाली तर, २०१६-१७ शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रम सुरु होऊ शकतो. 
 
कुंदायम मठाच्या कॅम्पसमध्ये संस्कृतचे अभ्यासवर्ग चालवले जातील. कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचा कुंदायम मठाने प्रस्ताव दिला आहे. सध्या गोव्यामध्ये फक्त शालेय स्तरावर संस्कृत शिकवले जाते. 
 
विशेष म्हणजे जर्मनीसारख्या देशामध्ये 14 विद्यापीठात जातेय संस्कृत भाषा... सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा.
 
महाराष्ट्रातही संस्कृत अकादमी स्थापणार
 
नागपूर : संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. या भाषेत जगाला मार्ग दाखविण्याची क्षमता आणि शक्ती असल्याने महाराष्ट्रातही या भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी लवकरच संस्कृत अकादमी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीमध्ये केली होती.
रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मारक भवनात आयोजित संस्कृत भारती विदर्भ प्रांत कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते जयराम व्यंकटेश पल्लेवार यांनी लिहिलेल्या ‘भारतरत्नमंजरी’ या संस्कृत काव्यपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू उमा वैद्य, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, प्रचार व प्रसार प्रमुख श्री.श. देवपुजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सर्व विभागांत संस्कृत भाषेचे बीएड महाविद्यालय सुरू करण्यात येईल. यासोबतच शालेय शिक्षणात संस्कृत भाषेचा समावेश कसा करता येईल, यासाठी शिक्षणमंत्र्यांसोबत चर्चा करून धोरण निश्चित करण्यात येईल. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाच्या विस्तारासाठी तसेच आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
इंग्रज राजवटीत संस्कृत भाषेच्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचे जाणीवपूर्वक शिक्षण पद्धतीत बदल करून संस्कृत भाषेला दूर ठेवण्यात आले, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रज येण्यापूर्वी भारतात संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी १२,५०० विद्यालये तर ७४२ महाविद्यालये होती.

Web Title: BA degree in Goa now comes from Sanskrit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.