पाठीत सुरा खूपसणाऱ्या आमदारांना लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही: निलेश काब्राल
By किशोर कुबल | Published: November 22, 2023 01:45 PM2023-11-22T13:45:33+5:302023-11-22T13:46:13+5:30
मी काही चुकीचे केले असे वाटणाऱ्यांनी मला भेटायला हवे होते
किशोर कुबल, पणजी : बांधकाममंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर निलेश काब्राल यांनी सहकारी आमदारांबद्दल प्रथमच तोंड उघडले असून पाठीत सुरा खुपसणाऱ्या आमदारांना लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, असे म्हटले आहे.
काब्राल म्हणाले की,‘मी काही चुकीचे केले आहे, असे कोणाही आमदाराला वाटत होते तर त्यांनी माझी प्रत्यक्ष भेट घ्यायला हवी होती. माझे दरवाजे सदोदित सर्वांसाठी खुले होते. मी कधीही कोणाही विरुध्द सुडाचे राजकारण केले नाही. कोणाही आमदाराची काही तक्रार असती तर त्यांनी मला प्रत्यक्ष भेटायला हवे होते.’
बांधकाम खात्यातील भरतीवरुन काही सत्ताधारी आमदारांनीच तक्रारी केल्या होत्या. काब्राल यांना या पदावरुन नंतर दूर व्हावे लागले. मंत्रिपद सोडल्यानंतर प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना प्रथमच वरील विधान केले आहे.