बाणस्तरी अपघात प्रकरण; तिघांना उडविणारा मर्सीडीस चालक जामीनवर मुक्त

By वासुदेव.पागी | Published: August 24, 2023 04:47 PM2023-08-24T16:47:10+5:302023-08-24T16:48:25+5:30

महत्तवाचे म्हणजे पोलिसांनीही त्याच्या कोठडीची मागणी केली नाही.

banastari accident Case; The driver of the Mercedes who blew up the trio is out on bail | बाणस्तरी अपघात प्रकरण; तिघांना उडविणारा मर्सीडीस चालक जामीनवर मुक्त

बाणस्तरी अपघात प्रकरण; तिघांना उडविणारा मर्सीडीस चालक जामीनवर मुक्त

googlenewsNext

पणजी: बाणस्तारी अपघात प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला मर्सीडीस चालक श्रीपाद उर्फ परेश सिनाय सावर्डेकर याला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्यागोवा खंडपीठाने सशर्त जामीन मंजूर केला. महत्तवाचे म्हणजे पोलिसांनीही त्याच्या कोठडीची मागणी केली नाही. ६ ऑगस्ट रोजी दारुच्या नशेत बेपर्वाईने कार चालवून आपघात करून तिघांचा जीव घेणारा खेळ परेशने केला होता.

७ ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली होती तर त्यानंतर १५ दिवस तो तुरुंगात होता. त्याने जामीनसाठी केलेला अर्ज फोंडा सत्र. न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्याने खंडपीठात धाव घेतली होती. अनेकवेळा सुनावणीस येऊन शेवटी गुरूवारी त्याच्या याचिकेवर निवाडा सुनावण्यात आला. त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. साक्षीदारांवर दबाव न आणणे, १ लाख रुपये हमी आणि १ लाख रुपयांच्या रकमेचे दोन हमीदार, गोव्याबाहेर सोडून न जाणे आणि तपास अधिकाऱ्यासमोर ८ दिवस हजेरी लावणे या अटी त्याच्यावर लादण्यात आल्या आहेत. दर दिवशी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत तो क्राीम ब्रँच कार्यालयात हजेरी लावणार आहे.

महत्तवाचे म्हणजे सुनावणी दरम्यान परेशला जामीन मंजूर व्हावा यासाठी त्याचे वकील आग्रही होते तर दुसऱ्या बाजूने सरकारी वकिलाने परेशच्या कोठडीसाठी आग्रह धरला नाही तो नाहीच, शिवाय त्याची कोठडी नको असल्याचेही न्यायालयात सांगून टाकले. यामुळे परेशच्या जामीन अर्जावर निवाडा सुनावणी न्यायालयाला सोपे झाले.

मर्सीडीस परेशच चालवित होता
दरम्यान अपघात झाला तेव्हा मर्सिडीस कार परेशच चालवित होता असा कबुली जवाब परेशची पत्नी मेघना सिनाय सावर्डेकर यांनी फोंडा प्रथमवर्ग न्यायालयाला सीआरपीसी १६४ अंतर्गत दिली आहे. म्हणजेच पतीच्या गुन्ह्याला पत्नीच साक्षिदार असे तूर्त म्हणता येईल. पोलिसांच्या तपासातही परेशच चालक असल्याचा निष्कर्श काढण्यात आला आहे.

 

Web Title: banastari accident Case; The driver of the Mercedes who blew up the trio is out on bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.