बाणावली जि. पं. पोटनिवडणुकीत ‘इंडिया’चे जोझेफ पिमेंता विजयी
By किशोर कुबल | Published: June 24, 2024 02:27 PM2024-06-24T14:27:05+5:302024-06-24T14:27:17+5:30
दहा ग्रामपंचायतींच्या वेगवेगळ्या दहा प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर झाला.
किशोर कुबल/पणजी
पणजी : बाणावली जि. पं. पोटनिवडणुकीत इंडिया अलायन्सचे उमेदवार जोझेफ पिमेंता ३०४९ मतांच्या आघाडीने विजयी ठरले. दहा ग्रामपंचायतींच्या वेगवेगळ्या दहा प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचाही निकाल जाहीर झाला.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार बाणावलीत जोझेफ पिमेंता यांना ५,६७२, ग्रेफान्स फर्नांडिस यांना २६२३,रॉयला फर्नांडिस यांना १,८४० तर फ्रॅंक फर्नांडिस यांना केवळ २७६ मतें मिळाली.
जोझेफ हे आम आदमी पक्षाचे नेते असून इंडिया अलयान्ससाठी आपने उमेदवार दिला होता. इतर तिघांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. भाजपने उमेदवार दिला नव्हता.
दहा ग्रामपंचायतींच्या १० वेगवेगळ्या प्रभागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत विजयी ठरलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत.
कुंडईच्या प्रभाग ७ मध्ये प्रियांका गावडे, वळवईच्या प्रभाग २ सर्वेश नाईक, केरीच्या प्रभाग ३ मध्ये प्रदीप जल्मी, बोरीच्या प्रभाग ११ मध्ये दत्तेश नाईक, राशोलच्या प्रभाग ५ मध्ये मीफा डायस, सेरावलीच्या प्रभाग २ मध्ये ज्युलिएटा गोम्स, असोळणाच्या प्रभाग १ मध्ये वंदना बुधाळकर, कुडणेच्या प्रभाग २ मध्ये श्रीकांत चिकनेकर, शेल्डेंच्या प्रभाग २ मध्ये स्वरांजली नाईक तर सुकूरच्या प्रभाग १० मध्ये सुभाष हळर्णकर विजयी ठरले.