बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जूनला; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

By किशोर कुबल | Published: May 20, 2024 03:27 PM2024-05-20T15:27:45+5:302024-05-20T15:28:58+5:30

'आप'च्या झेडपी हेन्झेल फर्नांडिस यांना जातीच्या दाखल्यावरुन अपात्र ठरवल्याने झाली होती जागा रिक्त

Banavali Zilla Panchayat by-election on June 23 Announcement of State Election Commission | बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जूनला; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जूनला; राज्य निवडणूक आयोगाची घोषणा

किशोर कुबल, पणजी: बाणावली जिल्हा पंचायत पोटनिवडणूक २३ जून रोजी होणार आहे. आम आदमी पक्षाचे बाणावलीचे झेडपी हेन्झेल फर्नांडिस यांना जातीच्या दाखल्यावरुन कोर्टाने अपात्र ठरवल्यानंतर ही जागा रिकामी झाली होती.

राज्य निवडणूक आयोगाने आता पोटनिवडणुकीची तारीख अधिकृतपणे जाहीर केली आहे. प्रशासकीय लवादाने ११ जानेवारी रोजी दिलेल्या अपात्रता आदेशास आव्हान देणारी फर्नांडिस यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
फर्नांडिस ज्या ख्रिश्चन मेस्त (सुतार) समुदायाचे आहेत, त्यांचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) राज्य यादीत समावेश नाही. ऑगस्ट २०१३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने हेन्झेल यांना दिलेले ओबीसी प्रमाणपत्र अवैध घोषित केले होते. २०२० साली झालेल्या झेडपी निवडणुकीत पराभूत झालेल्या काँग्रेसच्या उमेदवार रॉयला फर्नांडिस यांनी फर्नांडिस यांना अपात्र ठरवण्यासाठी आणि बाणावली झेडपी सदस्य म्हणून त्यांची निवड झाल्याचे घोषित करण्यासाठी प्रशासकीय लवादाकडे संपर्क साधला होता.

दरम्यान, आपने राज्य प्रमुख ॲड. अमित पालेकर यांनी  ख्रिश्चन मेस्त (सुतार) समाजाचा राज्य ओबीसी यादीत समावेश न केल्याने अडचणी निर्माण करण्यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. डिसेंबर २००६ मध्ये राज्य सरकारने विश्वकर्मा, च्यारी, मेस्त  समाजाला ओबीसी दर्जा देणारी अधिसूचना जारी केली परंतु त्यात त्यांच्या ख्रिश्चन समकक्षांचा उल्लेख केलेला नाही.

Web Title: Banavali Zilla Panchayat by-election on June 23 Announcement of State Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.