एटीएम स्कीमर विरोधी करा पोलिसांची बँकाना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2018 09:54 PM2018-04-04T21:54:39+5:302018-04-04T21:54:39+5:30
एटीएम मशीन्स स्कीमर विरोधी करण्याच्या सूचना गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व बँकांना केल्या आहेत. अलिकडे घडलेल्या स्कीमिंगच्या प्रकरणाचा धसका घेऊन पोलिसांकडून बँकांना ११ महत्त्वपूर्ण सूचनां करण्यात आल्या आहेत.
पणजी: एटीएम मशीन्स स्कीमर विरोधी करण्याच्या सूचना गोवा पोलिसांनी राज्यातील सर्व बँकांना केल्या आहेत. अलिकडे घडलेल्या स्कीमिंगच्या प्रकरणाचा धसका घेऊन पोलिसांकडून बँकांना ११ महत्त्वपूर्ण सूचनां करण्यात आल्या आहेत.
एटीएम मशीन्सना स्कीमर बसवून खातेदारांची गोपनीय माहिती चोरण्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे पोलिसांनी बँकांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. एटीएम मशीन्स स्कीमर विरोधी असावीत, स्कीमर बसविलेला असल्यास पाहाणी करण्यासाठी दिवसातून दोन वेळा तरी बँक अधिकाºयांनी एटीएम केंद्रात जावे, लाठीधारी सुरक्षा रक्षक चोविस तास ठेवावा व त्याच्याकडे धोक्याची सूचना देणारा अलार्म असावा, एटीएममध्ये प्रवेश करणाºयाचा आणि बाहेर पडणाºयाचा चेहरा टीपण्यासाठी अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात यावे, सीसीटीव्ही कॅमरे रात्रीच्या काळोखातही छायाचित्रे टीपणारे असावेत, स्थानिक बँक व्यवस्थापक फोनवरून संपर्क करण्यासाठी २४ तास उपलब्ध असावा. सुरक्षा रक्षक हे नोंदणीकृत एजन्सीकडूनच नेमले जावेत, एटीएममशीनमध्ये पैसे घालणाºया एजन्सीकडून पैसे घालतानाच अतिरिक्त एटीएम कार्डरीडर वगैरे बसविलेला असल्यास तपासून पाहावे अशा या सूचना आहेत. अलिकडेच एटीएम मशीनमध्ये स्कीमर लावणाºया एका विदेशी माणसाला पणजी पोलिसांनी अटक केली होती.