अंदाजपत्रक मांडताना सविस्तर वेळ द्या! फोंडा नगरपालिका बैठकीत मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:37 PM2023-03-27T19:37:57+5:302023-03-27T19:38:23+5:30

नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी पालिका बैठकीत चांगलाच आवाज चढवला.

Be detailed when budgeting Demand in Ponda Municipal Meeting Goa | अंदाजपत्रक मांडताना सविस्तर वेळ द्या! फोंडा नगरपालिका बैठकीत मागणी

अंदाजपत्रक मांडताना सविस्तर वेळ द्या! फोंडा नगरपालिका बैठकीत मागणी

googlenewsNext

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: नगरपालिका खर्चाचे अंदाजपत्रक मांडताना त्याच्यावर सविस्तर चर्चा व्हायला हवी. घाई गडबडीत अंदाजपत्रक मांडल्याने ते सोपस्कार केल्यासारखे होईल.घाईघाईत अंदाजपत्रक मांडल्यास त्यावर सविस्तर चर्चाही होणारच नाही असा मुद्दा काढत नगरसेवक व्यंकटेश नाईक यांनी सोमवारी झालेल्या पालिका बैठकीत चांगलाच आवाज चढवला. नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी वेळ कमी असल्याचे कारण पुढे करत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु नाईक आपल्या मागणीवर ठाम राहिले.

फोंडा नगरपालिकेत हल्ली नवीन अकाउंटंट रुजू झाले आहेत जे अंदाजपत्रक मांडण्यात येणार होते ते पूर्वीच्या लेखपाल ने तयार केले असल्याने आताच्या विद्यमान अकाऊंटंट ला फेरफार करून पुन्हा अंदाजपत्रक मांडण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगताच, व्यंकटेश नाईक यांनी हवे असेल तर पुढच्या पालिका मंडळाला त्यावर चर्चा करू दे परंतु जे काही व्हायचे ते व्यवस्थित व्हायला हवी अशी भूमिका मांडली. परंतु नगराध्यक्ष रितेश नाईक यांनी  तांत्रिक मुद्दा उपस्थित करत पुन्हा हवे तर सुधारित अंदाजपत्रक परत मांडूया असा मुद्दा उपस्थित करून व्यंकटेश नाईक यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

नगरपालिकेने नुकतेच सोपो पावणी करण्यासाठी निविदा काढली होती. सुमारे 63 लाख अंदाजाची निविदा काढण्यात आली होती परंतु सदरची रक्कम उचलायला कुणीच ठेकेदार पुढे न आल्याने तो आकडा 53 लाख वर करण्याचा ठराव सदर बैठकीत घेण्यात आला. यावेळी सुद्धा वेंकटेश नाईक यांनी अगोदर सविस्तर बायफर्केशन करा व नंतरच नवीन सुधारित दर लागू करा असा हेका धरला.
 इंदिरा मार्केट जवळ उभी राहिलेल्या एका इमारतीने अजून ड्रेनेज साठी व्यवस्था न केल्याने त्याला भोगवटा दाखला देताना त्याच्याकडून अगोदर ड्रेनेज साठी उपाययोजना करून घ्या व नंतरच त्याला भोगवटा दाखला द्या असा मुद्दा मांडला. यावेळी सुद्धा व्यंकटेश नाईक यांनी सदर इमारतीचा सुधारित आराखडा मागितला कारण  त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही दुकानाचे रूपांतर हे सदनिकांमध्ये करण्यात आले आहेत.
 शहरांमधली वाहतूक सुधारणेवर सुद्धा चर्चा करण्यात आली. आता ज्या बसेस कदंबा बस स्थानकावरून जुन्या बसस्थानकावर येतात ती सगळी वाहने दादा वैद्य यांच्या पुतळ्या कडून यूटर्न घेतात त्यांनी ठरवून दिलेल्या प्रमाणे पोलीस स्थानकाकडूनच वळण घ्यावे यासंबंधीच्या ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
 नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नसल्याने प्रत्येक वेळी कर्मचाऱ्यांचा पगार देण्यास वेळ लागतो. ज्या कर्मचाऱ्यांनी कर्ज वगैरे काढले आहेत त्यांना हप्ते भरताना अशावेळेस अधिक दंड भरावा लागतो.  संपूर्ण पगार देणार तेव्हा द्या अगोदर  ज्या लोकांनी कर्ज काढले आहे त्यांचा कर्ज हप्त्यांची रक्कम तरी सुरुवातीला अदा करावी अशी मागणी या बैठकीत व्यंकटेश नाईक यांनी केली. 
बैठकीनंतर पत्रकारांना अधिक माहिती देताना नगराध्यक्ष म्हणाले की आजच्या बैठकीत सगळ्या नगरसेवकांनी चांगले मुद्दे उपस्थित करून बैठक सुरळीत होण्यास सहकार्य केले. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा जरूर विचार करण्यात येईल. 78 कोटी येणे व एकूण खर्च 64 कोटी दाखवण्यात आला असून 14 कोटीची शिल्लक सुद्धा आगामी अंदाजपत्रकात दाखवण्यात आली आहे. नगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या आस्थापनांसाठी व घरांसाठी नवीन करप्रणाली लावण्याचा प्रस्ताव सध्या तरी रद्द करण्यात आला असून तूर्तास आहे तीच कर प्रणाली लागू होईल. व्यापारानी व नागरिकांनी कर वाढ संदर्भात दिलेले मुद्दे आम्ही विचारात घेऊनच हा निर्णय घेतला आहे. करवाढ केली नसली तरी पालिकेला महसूल कमी होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आमची खूपशी थकबाकी यायची अजून बाकी आहे. त्याचबरोबर महसूल वाढीसाठी नवीन पर्याय निवडले जातील.
 शहरातील वेगवेगळ्या नाल्यांमधील गाळ उपसण्यासाठी सुद्धा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. पाऊस सुरू व्हायच्या काही दिवस अगोदरच आम्ही हे काम पूर्ण करणार आहोत.  शहरातून वाहणारा कपिलेश्वरी नाला संदर्भात जलस्त्रोत खात्याकडे संपर्क साधण्यात आला असून तो नाला सुद्धा पावसापूर्वी स्वच्छ करण्यासाठी कृषी मंत्र्यांनी खास लक्ष घातले आहे.

Web Title: Be detailed when budgeting Demand in Ponda Municipal Meeting Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा