निर्धास्त रहा... भोममधील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन
By आप्पा बुवा | Published: August 20, 2023 06:14 PM2023-08-20T18:14:09+5:302023-08-20T18:14:23+5:30
भोम येथील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन
फोंडा - भोम येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना लोकांची एक इंच जमीन जाणार नाही. कुठल्याच मंदिराला धक्का पोहोचणार नाही. तसेच लागवडीखाली असलेल्या कोणत्याच जमिनीवर अतिक्रमण होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल. वेळ पडताच लोकांच्या बरोबर राहून आंदोलन करेन. असे ठोस आश्वासन क्रीडामंत्री व स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी भोमच्या नागरिकांना दिले. मागची काही वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्य प्रश्नावरून भोम येथे वेळोवेळी लहानसहान आंदोलने होत आली आहेत. मागच्या सहा महिन्यात नागरिकांनी चांगलाच जोर पकडला आहे. या संदर्भात नागरिकांची बाजू ऐकून घेण्यासाठी रविवारी गोविंद गावडे यांनी भोमीतील सातेरी मंडपात आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली.
यावेळी ग्रामस्थांची समजूत काढताना गोविंद गावडे पुढे म्हणाले की ह्या विषयावरून मागची काही वर्षे काही लोक जे राजकारण करत आहे ते अगोदर बंद व्हायला हवे. काही लोकांच्या जमिनी जाणार म्हणून भीती भीती वाटत आहे ती मुळात चुकीची आहे. ह्या संदर्भात खरी माहिती लोकांसमोर यावी म्हणून मागे एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीचे तज्ञ लोक येथे आले होते. परंतु लोकांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. खरी वस्तूस्थिती लोकांना समजावी म्हणून पुन्हा एकदा तज्ञ लोक आणून लोकांना खरी वस्तुस्थिती सांगण्यात येईल. त्यावेळी लोकांनी शहनिशा करावी. जर यावेळी लोकांच्या हक्काच्या जमिनी जात असेल असे जर आपल्याला लोकांनी दाखवून दिले तर, प्रसंगी लोकांच्या सोबत राहून खर आंदोलनात सहभाग घेईन. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर लोकांच्या बैठका आम्ही घेऊ. तिथे तुम्ही तुमची बाजू मांडा. आमचे सरकार हे सामान्य लोकांचे सरकार असून जे लोकांना हवे तेच आम्ही करत आलो असून, यापुढे सुद्धा आमची तीच भूमिका असेल. रविवारी सातेरी मंडपात आम्हाला बायपासच हवा ही मागणी घेऊन भोमचे ग्रामस्थ सातेरी मंडपात गोळा झाले होते. यावेळी सदर आंदोलनात मोठ्या संख्येने हाती फलक घेऊन स्त्रिया सुद्धा सहभागी झाल्या होत्या. काही काळ सदरचा परिसर हा ग्रामस्थांनी घोषणा दणाणून सोडला. आंदोलन करते मोठ्या संख्येने जमा होत आहेत ते पाहून पोलिसांनी सुद्धा आपली कुमक यावेळी वाढवून घेतली.
सुरुवातीलाच एका नागरिकांने सदर आंदोलनात बाहेरच्या व्यक्ती का असा सवाल करताच आंदोलन कर्ते भडकले व प्रकरण हातघाईवर गेले . एकामेकाची समजूत काढून नंतर बैठक सुरू झाली. लोकांच्या वतीने संजय नाईक यांनी ग्रामस्थांची बाजू मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर मांडली त्यांच्यामते एवढे दिवस लेखी आश्वासने मिळाली ती काही उपयोगाची नाहीत. यापुढे जे काही सरकारला सांगायचे आहे ते लेखी स्वरूपातच आमच्यासमोर यायला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल लोकांना थेट आव्हान देत आहेत की राष्ट्रीय महामार्ग सरकारला हवा त्याच मार्गतून होईल. सरकारला जे काही करायचे आहे ग्रामस्थांचे हित राखूनच करावे लागेल.