नवीन वर्षाच्या स्वागतास किनारे सज्ज; लाखो देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल

By काशिराम म्हांबरे | Published: December 30, 2023 05:14 PM2023-12-30T17:14:39+5:302023-12-30T17:16:41+5:30

जागतिक स्तरावरील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेला गोवा मावळत्या वर्षाला गुडबाय करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे.

Beaches are ready to welcome the new year in goa | नवीन वर्षाच्या स्वागतास किनारे सज्ज; लाखो देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल

नवीन वर्षाच्या स्वागतास किनारे सज्ज; लाखो देशी विदेशी पर्यटक गोव्यात दाखल

काशिराम म्हांबरे, म्हापसा: जागतिक स्तरावरील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र असलेला गोवा मावळत्या वर्षाला गुडबाय करुन नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. लाखो देशी विदेशी पर्यटक नवीन वर्ष साजरेकरण्यासाठी गोव्यात दाखल झालेआहे. किनारी भागातील हॉटेल्स पर्यटकांनी फुल झाली आहेत.  खास करुन कळंगुट, कांदोळी, बागातील परिसर आलेल्या पर्यटकांच्या गर्दीतून न्हाऊन गेला आहे.

काही हॉटेल व्यवसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी विदेशी पर्यटकांची संख्या बरीच कमी असून देशी पर्यटक जास्त प्रमाणावर दाखल झाले आहेत. वाढलेली गर्दी लक्षात घेऊन काही हॉटेल्सनी दिड ते दोन पटीनेभाव वाढ केली आहे.

डिसेंबरात सर्वात जास्त पर्यटक गोव्यात येत असतात . येणारे पर्यटक किनारी भागाला जास्त पसंती देत असतात. संध्याकाळनंतर किनाºयावर तर पर्यटकांची गर्दी जास्त असते.  येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कळंगुट येथील हॉटेल व्यवसायिक विरेंद्र शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आलेल्या पर्यटकांनी बहुतेक हॉटेल्स फूल झाली आहेत. विदेशी पर्यटक कमी प्रमाणावर असून श्रीलंकेतून जास्त पर्यटक आल्याची माहिती शिरोडकर यांनी दिली. केविन डिसोझा या खाजगी हॉटेल्सच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार अंतिम क्षणी होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्यटकांनी आगाऊ नोंदणी पर्यटकांकडून करण्यात आलेली. या वर्षी देशी पर्यटक जास्त असल्याचे डिसोझा म्हणाले.

नवीन वर्ष साजरे करण्यासाठी किनारी भागातील व्यवसायिकांनी विविध प्रकारच्या संगीत कार्यक्रमांचेआयोजन करण्यात आलेआहे. आकर्षणात भर घालण्यासाठी नामवंत कलाकारांनाही प्राचारण करण्यात आले आहे. पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी आकर्षक अशा सवलती सुद्धा जाहिर करण्यात आल्या आहेत.

कळंगुट किनारी भागात होणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन अवजड वाहनांना आत किनाऱ्याच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नसून बाहेर पार्क करण्याची सोय करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.  पर्यटकांच्या अडचणी दूर करण्यास, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसां सोबत नियोजनाच्या बैठका घेण्यात आलेल्या अशी माहिती कळंगुटचे सरपंच जोझफ सिक्वेरा यांनी दिली.

Web Title: Beaches are ready to welcome the new year in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.