थर्टी फस्टच्या आधी गोव्यात पर्यटन खात्याचा बडगा; बेकायदा कृत्यांना आळा बसणार

By किशोर कुबल | Published: October 31, 2022 06:57 PM2022-10-31T18:57:52+5:302022-10-31T18:58:40+5:30

पर्यटनस्थळांवर उघड्यावर मद्यपान, अन्नपदार्थ शिजविल्यास, कचरा फेकल्यास यापुढे ५ हजार रुपयांपासून ५0 हजार रुपयांपर्यंत दंड

Before the Thirty First, Tourism Department's Goa in Action mode; Illegal activities will be stopped | थर्टी फस्टच्या आधी गोव्यात पर्यटन खात्याचा बडगा; बेकायदा कृत्यांना आळा बसणार

थर्टी फस्टच्या आधी गोव्यात पर्यटन खात्याचा बडगा; बेकायदा कृत्यांना आळा बसणार

googlenewsNext

पणजी - गोव्यात यापुढे पर्यटनस्थळांवर उघड्यावर अन्नपदार्थ शिजविल्यास, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास, कचरा टाकल्यास तसेच किनाऱ्यांवर बेकायदा जलक्रीडांचे आयोजन व कोणत्याही प्रकारचा बेकायदा व्यवसाय थाटल्यास ५ हजार रुपयांपासून ५0 हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल किंवा भादंसंच्या १८८ कलमाखाली गुन्हा नोंदविला जाईल. यासंबंधीचा आदेश पर्यटन खात्याने काढला आहे.

गोव्यात गटागटाने स्वत:च्या वाहनांनी येणारे काही पर्यटक किनाऱ्यांवर किंवा अन्य पर्यटनस्थळांवर उघड्यावर अन्नपदार्थ शिजवतात तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करतात. अनेकदा मद्याच्या बाटल्या उघड्यावर फेकतात. किनाऱ्यावर रेतीतून चालताना फुटलेल्या बाटल्यांच्या काचा पायात घुसण्याचा धोका असतो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे.

किनाऱ्यांवर जलसफरी घडवून आणणाऱ्या बोटी, पॅराग्लायडिंग करणाऱ्या बोटींना ठराविक क्षेत्र आखून देण्यात आलेले आहे. अधिसूचित क्षेत्राबाहेर जलक्रीडांचे आयोजन केल्यास कारवाई केली जाईल. जलसफरी घडवून आणणाऱ्या बोटींची तिकीट निर्धारित काउंटरवरच विकता येतील. अनधिकृत विक्रेत्यांवर, पर्यटकांना सतावणाऱ्या दलालांवर कारवाई केली जाईल. पर्यटकांना उपद्रव करणारे भिकारी, हातगाड्यांवरुन अनधिकृतपणे अन्नपदार्थ विकणारे विक्रेते, किनाऱ्यावर बेकायदा डेक बेड टाकल्यास, किनाऱ्यावर अनधिकृतपणे वाहन हाकल्यास २00१ च्या पर्यटन स्थळ संवर्धन व देखभाल कायद्याच्या कलम १३ अन्वये वरील दंड ठोठावण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

पर्यटन खात्याचे संचालक निखिल देसाई यांच्या सहीने हा आदेश काढण्यात आला असून डीजीपी कार्यालय, सर्व पोलिस स्थानकांचे निरीक्षक, दोन्ही जिल्हाधिकारी, दोन्ही पोलिस अधिक्षक व अन्य संबंधितांना पाठवला आहे. दरवर्षी सुमारे ९0 लाख देशी व १0 लाख विदेशी पर्यटक गोव्याला भेट देत असतात. देशी पर्यटक किनाºयांवर उघड्यावर मद्यपान करतात, अशा तक्रारी स्थानिकांकडून येत असतात

Web Title: Before the Thirty First, Tourism Department's Goa in Action mode; Illegal activities will be stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा