दूधसागर पर्यटनाला सुरवात मात्र अपेक्षित प्रतिसाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 08:19 PM2020-10-26T20:19:02+5:302020-10-26T20:19:15+5:30

Dudhsagar Dam: पहिल्या दिवशी फक्त 110 च पर्यटक: 22 गाड्यानाच धंदा

The beginning of Dudhsagar tourism, however, is not the expected response | दूधसागर पर्यटनाला सुरवात मात्र अपेक्षित प्रतिसाद नाही

दूधसागर पर्यटनाला सुरवात मात्र अपेक्षित प्रतिसाद नाही

googlenewsNext

मडगाव: दूधसागर धबधब्यावर दोन दिवसांपूर्वी म्हणजे रविवारपासून पर्यटनाला सुरवात झाली असली तरी पहिल्या रविवारी पर्यटकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवशी केवळ 110 पर्यटकांनीच दूधसागरला भेट दिली जी आजवरची सर्वात निच्चांकी संख्या होती.

दूधसागरचा धबधबा पायथ्याकडून पाहण्यासाठी दरवर्षी लाखो देशी आणि विदेशी पर्यटक येत असतात शनिवार रविवार येथे पर्यटकांची गर्दी उसळते. या पर्यटकांना या धबधब्याच्या पायथ्याशी घेऊन जाण्यासाठी खास गाड्या ठेवलेल्या असतात.

रविवारपासून येथील पर्यटन सुरू झाले असले तरी त्याची फारशी कुणाला माहिती नसल्यानेच पर्यटक अपेक्षित प्रमाणात आले नसावेत अशी प्रतिक्रिया वाहन मालक संघटनेचे अध्यक्ष दिलीप मायरेकर यांनी व्यक्त केली. येत्या आठवड्यात या पर्यटनाला गती येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या ठिकाणी एकूण 431 गाड्या नोंदणीकृत असून दर गाडीतून  प्रत्येकी 5 पर्यटकांना नेण्यात येते. प्रत्येक पर्यटकामागे 700 रुपये आकारले जातात . गर्दी नियंत्रणात असावी यासाठी दररोज 180 तर शनिवार रविवारी 225 गाड्यांच्या ट्रिप्स होतात. मात्र रविवारी अवघ्या 22 ट्रिप्स झाल्या अशी माहिती देण्यात आली. या गाड्या सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सर्वात कमी पर्यटक संख्या 2019 साली 315 एव्हढी होती. तो नीचांकही या रविवारी मागे पडला.

दरवर्षी जशी गर्दी व्हायची तशी गर्दी यावेळी होणे कठीण आहे पण येत्या आठवड्या पासून स्थिती काही प्रमाणात सुधारेल अशी अपेक्षा आहे. देशी पर्यटक यंदा वाढतील अशी अपेक्षा आहे तसे झाल्यास आम्हला त्याचा फायदाच होईल असे मायरेकर म्हणाले.

Web Title: The beginning of Dudhsagar tourism, however, is not the expected response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.