गोवा फूड आणि कल्चरल फेस्टिवलला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 09:11 PM2018-02-09T21:11:25+5:302018-02-09T21:11:36+5:30
गोवा फूड आणि कल्चरल फेस्टिवलला आज येथे दमदार सुरुवात झाली, अनेक धमाल उत्सव आणि फेस्टिवल यांची पर्यटकांसाठी रेलचेल आणि चाहत्यांसाठी खान-पान सेवा आदींना मोठ्या प्रमाणात डी बी बांदोडकर ग्राऊंडवर सुरुवात झाली.
पणजी : गोवा फूड आणि कल्चरल फेस्टिवलला आज येथे दमदार सुरुवात झाली, अनेक धमाल उत्सव आणि फेस्टिवल यांची पर्यटकांसाठी रेलचेल आणि चाहत्यांसाठी खान-पान सेवा आदींना मोठ्या प्रमाणात डी बी बांदोडकर ग्राऊंडवर सुरुवात झाली.
पाच दिवसीय फूड आणि कल्चरल फेस्टिवल 2018 चे पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल, महापौर सुरेंद्र फुर्तादो, पर्यटन संचालक मिनिनो डिसुझा, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई आणि इतर उपस्थित होते. कार्निवल 2018 च्या सेलिब्रेशनच्या संध्याकाळी फूड फेस्टिवलला सुरुवात झाली, या फेस्टिवलला लाखो प्रेक्षक भेट देतील अशी अपेक्षा आहे.
हा वार्षिक फूड आणि कल्चरल धमाल उत्सवात पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगक्षेत्र; हॉटेलियर, रेस्टॉरंट, ब्रिव्हरेज ब्रँड आणि लाइफस्टाइल आउटलेट यांचे व्यावसायिक एकत्रितपणे येणार आहेत व आपल्या सेवा सादर करणार आहेत. याशिवाय उत्सवात धमाल करमणुकीचेही आयोजन करण्यात आले आहेत.
याबरोबरच जेवण आणि लाइफस्टाइलचे स्टॉल्ससह, लोकप्रिय राष्ट्रीय बँड्सचा कलाविष्कार असेल, यात अग्नी लागोरी, रवी चारी, जिनो बँक्स अँड ट्रूप यांचा समावेश असेल. याबरोबरच गोव्याच्या सर्वोत्तम बँड्स - क्रिमसन टाइड आणि ‘रागाज टू रिचेस’सह राहुल यांचे लाइव्ह म्युझिक, आंतरराष्ट्रीय कलाकारांचा नृत्याविष्कार, अनुषा शेखद्वारे फॅशन शो, वाळूमधील शिल्पकला कार्यशाळा आणि शेफ दे गोवा कुकिंग कॉण्टेस्ट अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे.
या वर्षी, फेस्टिवलमधील शेफ दे गोवा ही स्पर्धा म्हणजे तुमची पाककलेतील प्रतिभा आणि तज्ज्ञता दर्शवण्यासाठीचे उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेत गोव्यातील सर्वोत्कृष्ट अन्नपदार्थ चाखण्याची संधी मिळणार आहे. रोज सायंकाळी 6 वाजता सुरुवात होईल.