बालरथांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

By Admin | Published: March 3, 2017 01:48 AM2017-03-03T01:48:08+5:302017-03-03T01:48:28+5:30

पणजी : गोव्यातील बालरथांवरील म्हणजे शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील कंडोमची जाहिरात

Beginning the process of deleting condom advertising on Balrath | बालरथांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

बालरथांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

googlenewsNext

पणजी : गोव्यातील बालरथांवरील म्हणजे शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरील कंडोमची जाहिरात हटविण्याची प्रक्रिया कदंब वाहतूक महामंडळाने सुरू केली आहे. मात्र, कदंब बसगाड्यांवर असलेली जाहिरात काढण्याच्या सूचनेची अंमलबजावणी करण्यास आपल्याला भाग पाडण्यापूर्वी आपले म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती महामंडळाने गोवा राज्य महिला आयोगाला केली आहे.
कदंबच्या बसगाड्यांवर आणि बालरथांवरही कंडोमच्या जाहिराती असून त्यात एका महिलेचेही आक्षेपार्ह छायाचित्र आहे. ही जाहिरात काढून टाकली जावी, अशी मागणी रणरागिणी या महिला संस्थेने काही दिवसांपूर्वी महिला आयोगास निवेदन सादर करून केली होती. आयोगाने तत्काळ मागणीची दखल घेऊन कदंब महामंडळास पत्र पाठविले व जाहिराती हटविण्याची सूचना केली. महामंडळास आयोगाचे पत्र काल गुरुवारी मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बालरथांवर कंडोमची जाहिरात असू नये, या सूचनेचे तत्काळ पालन करण्यासाठी महामंडळाने पावले उचलली. संबंधित जाहिरात कंपनीला महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ती जाहिरात काढण्यास सांगितले व त्यासाठी कंपनीही तयार झाली. जाहिरात आपण तत्काळ हटवू, असे कंपनीने महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांना तोंडी सांगितले आहे.
दरम्यान, कदंबच्या अन्य बसगाड्यांवरील जाहिरात काढून टाकण्याची सूचना करण्यापूर्वी महिला आयोगाने महामंडळाचे म्हणणे ऐकून घेतलेले नाही, असे महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी घाटे यांनी गुरुवारी लोकमतला सांगितले. कदंब बसगाड्यांवरील जाहिरात ही टीव्हीवरही झळकते व राष्ट्रीय इंग्रजी दैनिकांवरही ती असते. शिवाय कदंब गाड्यांवर ती जाहिरात लावणे हे बेकायदा नव्हे, असा दावा घाटे यांनी केला आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Beginning the process of deleting condom advertising on Balrath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.