गोव्यात दारु पिताय खबरदार; दारु पिऊन वाहने चालविणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 09:35 PM2019-08-23T21:35:57+5:302019-08-23T21:48:46+5:30

गोव्यात पर्यटनाला जाताय मात्र सांभाळून दारु पिऊन वाहने हाकल्यास खबरदार.. पोलिसांनी दारुडया वाहन चालकांवर आता करडी नजर ठेवली आहे.

Beware of drunken fathers in Goa; Police take a close look at the drunk driver | गोव्यात दारु पिताय खबरदार; दारु पिऊन वाहने चालविणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर

गोव्यात दारु पिताय खबरदार; दारु पिऊन वाहने चालविणाऱ्यावर पोलिसांची करडी नजर

Next

सूरज पवार 

मडगाव: गोव्यात पर्यटनाला जाताय मात्र सांभाळून दारु पिऊन वाहने हाकल्यास खबरदार.. पोलिसांनी दारुडया वाहन चालकांवर आता करडी नजर ठेवली आहे. चालू वर्षाच्या जानेवारी ते जून या पहिल्या सहा महिन्यात दक्षिण गोव्यात मदयधुंद अवस्थेत वाहने चालविणाऱ्या 348 तळीरामांना पोलिसांनी दंड ठोठावला आहे. दरम्यानच्या काळात वाहतुक नियम भंगाच्या तब्बल 82,368 प्रकरणोही या जिल्हयात पोलिसांनी नोंदविलेल्या आहेत.

दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी मागच्या सहा महिन्यात रस्ता अपघातांच्या घटनेत घट झाली असल्याचे सांगितले. पोलिसांनी दारु पिउन वाहने हाकणाऱ्यावर कारवाई केली असून, या पुढेही ती चालूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बेभान वाहने हाकणो, वाहतुक परवान्यशिवाय वाहने चालविणो, सीट बॅल्ट तसेच हॅल्मेट न घालणो, ओव्हर टॅक व नो एन्ट्रीमधून वाहने हाकणो अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. वरील वाहतुक नियमाचा भंग करणाऱ्यावर पोलीस कारवाई करीत असल्याची माहिती गावस यांनी दिली.

दारु पिउन वाहने हाकणा:यावर कारवाईची सर्वात जास्त प्रकरणो मडगाव पोलीस ठाण्यात नोंद आहे. या ठाण्यात अशा प्रकाराची 60 प्रकरणो तर वास्को येथे 49 प्रकरणो जानेवारी ते जून या सहा महिन्यात पोलीस दफ्तरी नोंद आहेत. सांगे 43, फातोर्डा 31, कुंकळळी 25, मुरगाव 24, काणकोण 29, केपे 22, कोलवा 12, मायणा - कुडतरी 10 , कुडचडे 5, फोंडा 17, वेर्णा 18 तर कुळे येथे 2 प्रकरणो पोलीस दफ्तरी नोंद झाल्या आहेत.

मोटर वाहन नियमांचा भंग करणारी सर्वात जास्त प्रकरणो चालू वर्षाच्या सहा महिन्यात फोंडा पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या आहेत. या ठाण्यात 10,627 अशी प्रकरणो नोंदविली गेली आहे. त्यानंतर वेर्णा 8726, वास्को 8452 तर काणकोण 6750, कुळे 6779, मडगाव 5627, मायणा - कुडतरी 3264, कोलवा 2887, कुंकळळी 5805, कुडचडे 5616,सांगे 3388,1585 मुरगाव,2370 एअरपोर्ट पोलीस ,5489 फातोर्डा व 5002 केपे पोलीस ठाणो असा क्रम लागत आहे.

गतीमर्यादा उपकरणाचाही पोलीस वापर करीत आहेत. वाहने किती वेगाने हाकत होत्या याची माहिती या उपकरणातून पोलिसांना मिळत आहे. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात दक्षिण गोव्यात एकूण 55 अपघाती मृत्यूंच्या घटनांची नोंद झाली आहे. तर 105 किरकोळ अपघात घडलेले आहेत. अपघातीमृत्यू प्रकरणातील 51 प्रकरणांचा तपास पूर्ण झाला आहे. दुचाकी चालक हॅल्मेट घालत असल्याने अपघाती मृत्यूंच्या घटनेत घट झाली असल्याचेही दक्षिण गोवा पोलीस अधिक्षक अरविंद गावस यांनी सांगितले. 

वाहन नियम कायदयाची कडक अमलबंजावणी केली जात आहे. वाहतुक नियमाविषयी वाहन चालकांना मार्गदर्शनही पोलिसांकडून केले जात आहे असेही त्यांनी सांगितले. सहा महिन्यात ज्या अपघाती मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत त्यातील सर्वात जास्त म्हणजे नउ प्रकरणो मायणा - कुडतरी पोलीस ठाण्याच्या हददीत घडलेल्या आहेत. आठ वास्को, फातोर्डा, काणकोण व फोंडा येथे प्रत्येकी सहा, कुंकळळीत पाच, केपे येथे चार , मडगाव व वेर्णा येथे प्रत्येकी तीन तर कोलवा व कुडचडे येथे प्रत्येकी दोन व कुळे येथे एक अपघाती मृत्यू प्रकरणांचा समावेश आहे. 

Web Title: Beware of drunken fathers in Goa; Police take a close look at the drunk driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.