सावधान! समुद्रात ऊसळतील ऊंच लाटा, चक्रिवादळ बायपरजॉय इफेक्ट 

By वासुदेव.पागी | Updated: June 7, 2023 18:22 IST2023-06-07T18:22:44+5:302023-06-07T18:22:54+5:30

गोव्याच्या समुद्रातही ऊंचलाटा उसळण्याच्या शक्यता असल्यामुळे लोकांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

Beware High waves in the sea, Cyclone byperjoy effect | सावधान! समुद्रात ऊसळतील ऊंच लाटा, चक्रिवादळ बायपरजॉय इफेक्ट 

सावधान! समुद्रात ऊसळतील ऊंच लाटा, चक्रिवादळ बायपरजॉय इफेक्ट 

पणजीः अरबी समुद्रात निर्माण झालेले चक्रीवादळ बायपरजॉयमुळे समुद्र खवळला असून ऊंच लाटा ऊसळू लागल्या आहेत. गोव्याच्या समुद्रातही ऊंचलाटा उसळण्याच्या शक्यता असल्यामुळे लोकांनी समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 

बायपर जॉय चक्रिवादळ हे गोव्याच्या किनाऱ्यापासून ८२० किलोमीटर अंतरावर आहे, परंतु त्याच्या प्रभावापासून आणि परिणामापासून गोवा अलिप्त राहू शकत नाही. गोव्यातील बहुतेक समुद्र किनाऱ्यांवर जाणे या काळात धोकादायक ठरू शकते. कारण ऊंच लाटा किनाऱ्याला आधळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. शिवाय समुद्रही प्रचंढ खवळलेला असल्यामुळे मासेमारी करण्यास धोकादायक बनले आहे. विशेष करून वास्को ते मोरजी पर्यंतचा समुद्र हा धोकादायक बनला असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 

बायपरजॉय चक्रिवादळ हे ताशी ५ किलोमीटर अशा वेगाने उत्तरेकडे सरकत आहे, परंतु या चक्रिवादळाच्या प्रभावामळे  ताशी १२५ ते १५०  किलोमीटर वेगाने वादळी वारा वाहत आहे. या वाऱ्यामुळे या लाट उसळत आहेत. 

मान्सूनला पोषक वातावरण -
लांबणीवर पडलेला मान्सून आता केरळात केव्हाही दाखल होवू शकतो. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिरूअनंतपुरममध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र मान्सून दाखल झाल्याचे जाहीर क रण्यासाठी काही निकषांची पूर्ती होणे आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने अजून मान्सून केरळात दाखल झाल्याची घोषणा केलेली नाही. परंतु ४८ तासात अशी घोषणा केव्हाही होवू शकते.

Web Title: Beware High waves in the sea, Cyclone byperjoy effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.