वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग; कोट्यावधींची नुकसानी झाल्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 10:15 PM2020-03-05T22:15:56+5:302020-03-05T22:16:25+5:30

भयंकर आगीवर नियंत्रण आणण्यासाठी ३ तासाहून जास्त वेळ अग्निशामक दलाचे जवान घेत होते अथक परिश्रम

BIG fire in the verna industrial estate | वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग; कोट्यावधींची नुकसानी झाल्याचा अंदाज

वेर्णा औद्योगिक वसाहतीत भीषण आग; कोट्यावधींची नुकसानी झाल्याचा अंदाज

Next

वास्को: दक्षीण गोव्यात असलेल्या वेर्णा औद्योगिक वसाहतीतील ‘सेंट्रल वेअरहाऊझींग कॉप्रेशन’ च्या गोदामांना आज (गुरूवारी, दि: ५) संध्याकाळी ७ च्या सुमारास लागलेल्या भयंकर आगीत आत असलेली कोट्यावधी रुपयांची सामग्री जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी वेर्णा अग्निशामक दलाच्या बंबासहीत गोव्यातील इतर भागातील अग्निशामक बंबांनी घटनास्थळावर धाव घेतली असून रात्री १० वाजे पर्यंत दलाचे जवान आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अथक प्रयत्न करत असल्याचे दिसून आले.


अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास सदर आगीची घटना घडली. वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या सेंट्रल वेअरहाऊझींग कॉप्रेशन (केंद्रीय वखार महामंडळ) च्या गोदामांना भयंकर अशी आग लागल्याची माहीती वेर्णा अग्निशामक दलाला मिळताच दलाच्या जवानांनी अग्निशामक बंबासहीत त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. येथे लागलेल्या भयंकर आगीमुळे धूराचे लोण सर्वत्र पसरल्याचे अग्निशामक दलाच्या जवानांना दिसून आले. तसेच आगीचा वणवा गोदाम व परिसरात मोठ्या प्रमाणात पसरल्याने या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या आणखीन बळाला आणणे गरजेचे असल्याचे समजताच नंतर त्वरित वास्को, मडगाव व इतर भागातील अग्निशामक दलाच्या जवानांनी बंबासहीत घटनास्थळावर धाव घेतली. येथे लागलेल्या भयंकर अशा आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहा अग्निशामक दलाचे बंब पाण्याचे फव्वारे मारत असल्याची माहीती सूत्रांक कडून उपलब्ध झाली.

आग लागलेल्या या गोदामात विविध कंपनींच्या असलेल्या फायबर केबल्स, प्लास्टिक ग्रेन्युल्स, टायर्स तसेच इतर विविध सामग्री जळून खास झाल्याची माहीती सूत्रांकडून उपलब्ध झालेली असून यामुळे कोट्यावधी रुपयांची हानी झाल्याचा सद्या अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर आग कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट झालेले नसल्याची माहीती सूत्रांनी देऊन या घटनेमागे घातपाताची शक्यता आहे का याबाबत वेर्णा पोलीस तपासणी करणार असल्याचे कळविले. सदर घटनेबाबत अधिक माहीती घेण्यासाठी वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर यांना संपर्क केला असता पोलीसांनी आगीची घटना नोंद केली असल्याचे सांगितले.

संध्याकाळी सात च्या सुमारास येथे भयंकर अशी लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान अथक प्रयत्न करत असून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना आगीवर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यास यश प्राप्त झाल्याची माहीती सूत्रांनी दिली. या घटनेत नेमके केवढे नुकसान झाले आहे हे समजू शकले नसले तरी नुकसानीचा आकडा कोट्यावधी असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथे लागलेल्या भयंकर आगीच्या घटनेत सुदैवाने कुठल्याच प्रकारची जीवीतहानी झालेली नसल्याची माहीती वेर्णा पोलीस निरीक्षक हरीष मडकईकर यांनी दिली. अग्निशामक दल तसेच पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करणार आहेत.

Web Title: BIG fire in the verna industrial estate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग