काँग्रेसला सासष्टीत मोठी आघाडी अशक्य; मुख्यमंत्र्यांनी मांडला हिशेब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2024 07:20 AM2024-05-30T07:20:12+5:302024-05-30T07:21:26+5:30
पल्लवी धेंपे २५ हजार मतांनी जिंकतेय
सद्गुरू पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सासष्टी तालुक्यात काँग्रेसला फक्त ४० हजार मतांची आघाडी मिळेल. याहून जास्त आघाडी मिळणार नाही, असा हिशेब मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल खास 'लोकमत'शी बोलताना मोडला. तसेच भाजपच्या उमेदवार पल्लवी धेपे ह्या २५ हजार मतांची आघाडी घेऊन जिंकतात याचा पूर्ण विश्वास आपल्याला आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सावंत हे डेहराडून येथे खासगी दौऱ्यावर गेले आहेत. तिथून गोव्याच्या राजकीय विषयांवर 'लोकमत'शी ते सविस्तर बोलले. मुख्यमंत्री म्हणाले की, 'सासष्टीत काँग्रेसला साठ हजार मतांची लिड मिळणारच नाही. फक्त ४० हजार मतांची आघाडी मिळेल हे मी पूर्ण अभ्यासाअंती सांगत आहे. आम्ही व्यवस्थित फिल्डिंग लावली होती. बाणावली, वेळ्ळी, नुवे आणि मिळालीच तर कुंकळ्ळी मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारास आघाडी मिळेल. फातोडांमध्ये आम्ही एक हजार मतांची आघाडी घेतोय. पूर्ण दक्षिण गोव्यात आणखी कुठेच काँग्रेसला आघाडी नसेल.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'सांगे, केपे, कुडचडे, सावर्डे हे मतदारसंघ तसेच फोडा व मुरगाव तालुक्यात भाजपला खूप मोठी लीड मिळणार आहे. महगाव मतदारसंघातही आघाडी मोठी असेल. त्यामुळे पल्लवी धेपे केवळ दहा हजार नव्हे तर पंचवीस हजार मतांनी निवडून येणार आहे. ख्रिस्तीधर्मीय जेवढी मते काँग्रेसने अपेक्षित धरली, तेवढी ती त्यांना मिळणार नाही. अनेक खिस्ती मतदार व नेते आमच्यासोबत होते, भाजपलाच खिस्ती धर्मियांचीही खूप मते यावेळी मिळतील.'
गोविंद गावडे यांच्याशी मी बोलणार
दरम्यान, मंत्री गोविंद गावडे यांच्या विधानांविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, भी लवकरच मंत्री गावडे यांच्याशी सविस्तर बोलणार आहे. मी गोव्यात परतल्यानंतर गावडे यांच्याशी बैठक घेईन. गावडेदेखील गोव्याबाहेर होते व त्यामुळे भेट होऊ शकली नाही. पण त्यांच्याशी मी चर्चा करीन. सध्या गोव्यात मंत्रिमंडळ फेररचनेचा वगैरे आपला विचारच नाही