गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना मोठा दिलासा; कर्मचारी निवड आयोगामार्फत येणार
By किशोर कुबल | Published: December 9, 2023 05:28 AM2023-12-09T05:28:10+5:302023-12-09T05:28:27+5:30
येत्या ३१पूर्वी नोकरीची पहिली जाहिरात, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर
“प्रक्रियेला थोडा विलंब झाला आहे,” ते म्हणाले. वृत्तपत्रांमध्ये आणि आयोगाच्या वेबसाइटवर (https://gssc.goa.gov.in/) जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच भरतीची प्रक्रिया सुरू होणे अपेक्षित आहे. परीक्षा संगणकावर आधारित असतील. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये या पदांसाठी मुलाखती होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी असाही पुनरुच्चार केला की, एमटीएस (मल्टीटास्किंग)ते एलडीसी (कनिष्ठ लिपिक) पदांसाठी एक वर्षाचा अनुभव किंवा एक वर्ष शिकाऊ उमेदवारी अनिवार्य असेल.
कोणत्याही सरकारी खात्यामध्ये मंत्र्यांचा वशिला ही उमेदवारांसाठी जमेची बाजू असू नये, यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्मचारी निवड आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतला. वशिलेबाजी बंद करण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यानुसार आयोग स्थापन करून आता प्रत्येक सरकारी खात्यात भरती या आयोगामार्फत होणार आहे. गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना हा फार मोठा दिलासा ठरणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या निर्णयामुळे काही मंत्री नाराज आहेत. परंतु सावंत सरकारने हा निर्णय पुढे नेण्याचे ठामपणे ठरवले आहे.