कुठ्ठाळी येथे ‘फायबरग्लास बोट’ बनवणा-या यार्डमध्ये आग लागून कोट्यवधीचं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 11:38 PM2020-04-26T23:38:31+5:302020-04-26T23:38:37+5:30
याघटनेत नेमकी केवढी नुकसानी झाली आहे हे सांगणे सद्या कठीण असले तरी अडीच कोटीहून जास्त रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
वास्को: दक्षिण गोव्यातील ठाणे, कुठ्ठाळी येथे असलेल्या ‘फायबरग्लास बोट’ नौका बनवणाºया यार्डमध्ये रविवारी (दि.२६) संध्याकाळी ६ च्या सुमारास भयंकर आग लागल्याने येथे कोट्यावधी रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या यार्डमध्ये तीन ‘फायबर ग्लास बोट’ बनवण्याचे काम चालू असून यापैंकी एक नौका पूर्णपणे तयार झालेली असून आगीत तीनही नौकांची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली. याघटनेत नेमकी केवढी नुकसानी झाली आहे हे सांगणे सद्या कठीण असले तरी अडीच कोटीहून जास्त रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला.
वेर्णा अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार रविवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास सदर घटना घडली. कुठ्ठाळी येथे असलेल्या ‘विद्याविहार हायस्कूल’ जवळ असलेल्या ‘फायबरग्लास बोट’ बनवणाºया यार्डमध्ये बांधण्यात येणाºया नौकांना भयंकर आग लागल्याचे जवळपास असलेल्या नागरिकांना दिसून येताच त्यांनी अग्निशामक दल तसेच पोलीसांना याबाबत माहीती दिली. तसेच या नागरिकांनी आग विझवण्यासाठी त्यांच्यापरि प्रयत्नाने पाणी मारण्यास सुरवात केले. कुठ्ठाळी येथे असलेल्या यार्डमध्ये आग लागल्याची माहीती मिळताच वास्को अग्निशामक दलाच्या बंबाने प्रथम त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन बांधण्यात येत असलेल्या नौकांना लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या कार्यास सुरवात केली. त्यांच्या पाठोपाठ वेर्णा अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळावर दाखल होऊन त्यांनी सुद्धा येथे लागलेली आग विझवण्याच्या कामाला सुरवात केली. या घटनेबाबत अधिक माहीती घेण्यासाठी कुठ्ठाळीचे माजी उपसरपंच तथा सद्याचे पंच रेमंण्ड डी’सा यांना संपर्क केला असता ‘फायबर ग्लास बोट’ बांधणाºया या यार्डमध्ये तीन नौका बांधण्यात येत असल्याची माहीती त्यांनी दिली. यापैंकी एक नौका पूर्ण बांधून तयार झालेली असून अन्य दोन नौकांचे (फायबर मोल्ड) बºयाच प्रमाणात काम झाले होते असे माहीतीत सांगितले. येथे लागलेल्या आगीने तीनही नौकांना पेट घेऊन या नौकांचा बहुतेक भाग जळून खास झाल्याने सदर घटनेत कोट्यावधी रुपयांची नुकसानी झाली असावी असा अंदाज पंच रेमंंण्ड डी’सा यांनी व्यक्त केला. पूर्ण झालेली नौका लॉकडाऊननंतर समुद्रात उतरवण्यात येणार होती अशी माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या नौका कोणासाठी बांधण्यात येत होत्या याबाबत योग्य माहीती मिळाली नसली तरी त्या कोस्टल पोलीस विभागासाठी बांधण्यात येत होत्या अशी माहीती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली. यार्डमध्ये पूर्ण झालेली एक नौका तसेच बांधण्यात येत असलेल्या अन्य दोन नौकांना (फायबर मोल्ड) लागलेली आग आटोक्यात आणण्याच्या कामाला सुरवात केल्यानंतर सुमारे दीड तासाने अग्निशामक दलाला यात यश प्राप्त झाले. यानंतरही काही वेळ दलाचे जवान पुन्हा येथे आग लागण्याची घटना घडू नये याची खात्री करण्यासाठी उपस्थित होते. सदर आगीच्या घटनेत सुदैवाने कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही अशी माहीती अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कुठ्ठाळी येथे रविवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेत नेमके केवढे नुकसान झाले आहे हे स्पष्ट झाले नसलेतरी कोट्यावधी रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग लागण्यामागचे कारण काय हे सुद्धा स्पष्ट झालेले नसून याबाबतही अग्निशामक दलाकडून तपासणी चालू असल्याचे सूत्रांनी कळविले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाला ९ वेळा बंबांनी पाणी आणून फव्वारणी करावी लागली अशी माहीती सूत्रांनी दिली. वेर्णा पोलीसांना सदर घटनेची माहीती मिळता त्यांनीही घटनास्थळावर दाखल होऊन येथे पंचनामा केला.
साकवाळ, वेर्णा येथे काजू बागायतीला लागली आग
कुठ्ठाळी येथील नौका बांधणाºया यार्डमध्ये लागलेल्या आगीची माहीती वेर्णा अग्निशामक दलाला जेव्हा मिळाली त्यावेळी त्यांचे अग्निशामकबंब वाहन अन्य ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी गेल्याने यार्डमध्ये लागलेल्या घटनास्थळावर पोचण्यास वेर्णा अग्निशामक दलाच्या बंबाला उशिर झाला. घटनास्थळावरून जवळ असलेल्या वेर्णा अग्निशामक दलाचा बंब साकवाळ येथील काजू बागायतीत लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी गेल्याने त्यांना कुठ्ठाळी येथे लागलेल्या आगीच्या घटनास्थळावर पोचण्यास उशिर होणार असल्याचे समजताच नंतर वास्को अग्निशामक दलाच्या बंबाला त्वरित कुठ्ठाळी येथील घटनास्थळावर पाठवण्यात आले. साकवाळ येथील कलाभवन प्रकल्पाच्या थोड्या अंतरावर असलेल्या काजूच्या बागायतीत लागलेली आग वेर्णा अग्निशामक दलाच्या बंबांनी आटोक्यात आणल्यानंतर ते त्वरित कुठ्ठाळी येथील घटनास्थळावर पोचल्याची माहीती सूत्रांनी दिली.