राज्यातील पंचायत कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू

By पूजा प्रभूगावकर | Published: July 6, 2024 05:08 PM2024-07-06T17:08:47+5:302024-07-06T17:08:58+5:30

पंचायत कर्मचारी हे सरकारी सेवक आहेत. मात्र अनेकदा ते कामावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष करुन ग्रामीण भागातील पंचायत कार्यालयांमध्ये असे अनेकदा दिसून येते.

Biometric attendance system to be implemented soon for panchayat employees in the state | राज्यातील पंचायत कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू

राज्यातील पंचायत कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू

पणजी: पंचायत कर्मचाऱ्यांसाठी आता लवकरच बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू केली जाईल. यामुळे कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करडी नजर राहील असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

पंचायत कर्मचारी हे सरकारी सेवक आहेत. मात्र अनेकदा ते कामावर गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष करुन ग्रामीण भागातील पंचायत कार्यालयांमध्ये असे अनेकदा दिसून येते. त्यामुळे हे कर्मचारी कामावर हजर असतात की गैरहजर हे समजण्यासाठी पंचायत कर्मचाऱ्यांसाठी आता बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू केली जाईल असे त्यांनी सांगितले.

गुदिन्हो म्हणाले, की ग्रामीण भागातील पंचायत कार्यालयांमध्ये काम कमी असते असे म्हणत अनेक पंचायत कर्मचारी हे कामावरच जात नाही. किंवा ते कामावर अनियमितपणे जातात. काम कमी असले म्हणून त्यांनी कामावरच गैरहजर राहणे हे योग्य नाही. मात्र आता अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: Biometric attendance system to be implemented soon for panchayat employees in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.