भाजपचा उमेदवार आज ठरणार; गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्याशी मुख्यमंत्र्यांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 11:46 AM2024-02-29T11:46:42+5:302024-02-29T11:47:04+5:30
दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकसभेसाठी गोव्यातील दोन्ही जागांवर उमेदवारांच्या नावांबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल, बुधवारी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली.
भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडून आज, उद्या उमेदवार जाहीर केले जातील. प्राप्त माहितीनुसार, गोवा तसेच पुड्डुचेरी, मणिपूर आदी लहान राज्यांचे उमेदवार जाहीर करण्यासाठी पक्षाच्या संसदीय मंडळाची आज, गुरुवारी दिल्लीत बैठक होणार आहे. मुख्यमंत्री दिल्ली भेट आटोपून सायंकाळी गोव्यात परतले. उत्तर गोव्यातून दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर आणि दिलीप परुळेकर यांची नावेही पक्षाने पाठवली असली तरी खासदार श्रीपाद नाईक यांनाच उत्तरेची तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
दक्षिणेसाठी माजी खासदार तथा एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकर, प्रदेश सरचिटणीस दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, आमदार दिगंबर कामत आणि सभापती रमेश तवडकर अशी पाच नावे पाठवली आहेत.