कोळसा वाहतुकीच्या पाठिंब्यामुळे दक्षिणेत भाजपचा पराभव; गोवा फॉरवर्डचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 03:32 PM2024-06-13T15:32:45+5:302024-06-13T15:34:11+5:30

राज्यात कोळसा वाहतुकीला सरकारने पाठिंबा दिल्याने दक्षिणेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.

bjp defeat in south goa due to support of coal transport goa forward alleges  | कोळसा वाहतुकीच्या पाठिंब्यामुळे दक्षिणेत भाजपचा पराभव; गोवा फॉरवर्डचा आरोप 

कोळसा वाहतुकीच्या पाठिंब्यामुळे दक्षिणेत भाजपचा पराभव; गोवा फॉरवर्डचा आरोप 

नारायण गावस, पणजी: राज्यात कोळसा वाहतुकीला सरकारने पाठिंबा दिल्याने दक्षिणेत भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. अजूनही मुरगाव बंदर वाहिनीच्या खोलीकरणाला जीसीझेडएमएने मान्यता दिली आहे. ती त्वरीत मागे घ्यावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते विकास भगत यांनी पत्रकार परिषदेत केली.

भाजपचे नेते  दक्षिण गोव्यातील पराभवाला काही धर्मगुरुंना  दाेषी ठरवत आहे, पण तसे नसून दक्षिणेत काेळसा वाहतूक व डबल ट्रॅकिंगला विरोध हाेत आहे. याच्या विरोधात कॅप्टन विरियातोंचा पाठिंबा मिळाला पण भाजपने याला पाठिंबा दिलेला नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आहे. पण याची दखल अजूनही भाजपने घेतलेली नाही आता पुन्हा सीझेडएमएने बंदर खोलीकरणाला मान्यता दिली आहे.  मोठ्या आकाराच्या जहाजांना सामावून घेऊन कोळशाची वाहतूक सुलभ करणे हा मख्य उद्देश आहे.  पोर्ट चॅनेलच्या खोलीकरणासाठी जीसीझेडएमएची मान्यता त्वरित मागे घेण्याची आमची मागणी आहे, असे विकास भगत म्हणाले.

विकास भगत म्हणाले या काेळसा वाहतुकीमुळे मुरगावातील लाेकांना अनेक आजार होणार आहेत. समुद्रातील अनेक लहान जीव मृत्यूमुखी पडणार आहे. पण सरकारला याचे काहीच पडलेले नाही. गाेवा फॉरवर्डचे अध्यक्ष हा विषय पुन्हा अधिवेशनात मांडणार आहे.

Web Title: bjp defeat in south goa due to support of coal transport goa forward alleges 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.