भाजप आपल्या कार्यक्रत्याला योग्य मान देतो; नवनिर्वाचीत नगराध्यक्ष गीरीश बोरकर

By पंकज शेट्ये | Published: July 14, 2023 06:26 PM2023-07-14T18:26:05+5:302023-07-14T18:26:48+5:30

पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यक्रर्त्याला जर त्याच्या कामाची चांगली परतफेड कुठला पक्ष करतो तर तो भारतीय जनता पक्ष असल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले.

BJP gives due respect to its activists Newly elected Mayor Girish Borkar | भाजप आपल्या कार्यक्रत्याला योग्य मान देतो; नवनिर्वाचीत नगराध्यक्ष गीरीश बोरकर

भाजप आपल्या कार्यक्रत्याला योग्य मान देतो; नवनिर्वाचीत नगराध्यक्ष गीरीश बोरकर

googlenewsNext

वास्को : पक्षासाठी काम करणाऱ्या एका सामान्य कार्यक्रर्त्याला सुद्धा त्याच्या कामाची परतफेड चांगल्या पद्धतीने करण्याचे काम फक्त भारतीय जनता पक्षच करत असून त्यामुळेच आज मला मुरगावचा नगराध्यक्ष बनण्याचा मान मिळाला आहे. मुरगाव नगरपालिकेतील सर्व नगरसेवकांनी मला पाठिंबा देत बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्याने मी सर्व नगरसेवकांचा आभारी आहे. सर्व नगरसेवकांना एकत्रीत घेऊन मी मुरगाव नगरपालिकेच्या पंचवीसही प्रभागांच्या विकासासाठी काम करणार असल्याचे आश्वासन मुरगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचीत नगराध्यक्ष गीरीश बोरकर यांनी दिले.

गेल्या आठवड्यात लीयो रॉड्रीगीस यांनी सत्ताधारी गटातील नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार दुसऱ्या नगरसेवकाला नगराध्यक्ष बनवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मार्ग मोकळा केला होता. त्यानंतर मुरगाव नगरपालिकेचा नवीन नगराध्यक्ष निवडण्यासाठी शुक्रवारी (दि.१४) बैठक घेण्याचे निश्चित केले होते. गुरूवारी (दि.१३) नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगरसेवक गीरीश बोरकर यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे ते बिनविरोध नगराध्यक्ष पदावर निवडून येणार असल्याचे निश्चित झाले असून शुक्रवारी त्यांना नगराध्यक्ष म्हणून घोषित करण्याचे सोपस्कार राहीले होते. शुक्रवारी पालिका सभागृहात नगराध्यक्ष निवडण्याच्या बैठकीला सुरवात झाल्यानंतर तेथे निर्वाचन अधिकारी म्हणून उपस्थित असलेले मुरगावचे उपजिल्हाधिकारी भगवंत करमळी यांनी गीरीश बोरकर यांची नगराध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर गीरीश बोरकर यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केले. 

पक्षासाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यक्रर्त्याला जर त्याच्या कामाची चांगली परतफेड कुठला पक्ष करतो तर तो भारतीय जनता पक्ष असल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले. माझ्या नगराध्यक्ष बनण्यामागे श्रेय प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, नगरविकासमंत्री विश्वजीत राणे, पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि इतरांना जात असल्याचे त्यांनी सांगितले. मला बिनविरोध नगराध्यक्ष बनवण्यासाठी माजीमंत्री मिलींद नाईक, माजी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या समर्थक नगरसेवकांनी पाठींबा दिल्याने बोरकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. मला सर्व नगरसेवकांनी पाठींबा देऊन बिनविरोध नगराध्यक्ष म्हणून निवडून दिल्याने मी सर्वांना एकत्रीत घेऊन विकासासाठी काम करणार. मुरगाव नगरपालिकेच्या पंचवीसही प्रभागाच्या विकासासाठी मी काम करणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले. मुरगाव नगरपालिकेच्या हद्दीत असलेली कचरा समस्या दूर करण्याकरिता मी पुढाकार घेऊन भविष्यात ती समस्या पूर्णपणे दूर व्हावी यासाठी काम करणार असल्याचे नगराध्यक्ष बोरकर यांनी सांगितले.

नवनिर्वाचित नगराध्यक्ष गीरीश बोरकर वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांचे खास समर्थक आहेत. साळकर यांनी नगरपालिकेत उपस्थिती लावून बोरकर यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गीरीश बोरकर यांची नगराध्यक्ष पदावर निवड झाल्याने आम्हाला अत्यंत आनंद झालेला असल्याचे साळकर म्हणाले. यापूर्वीचे नगराध्यक्ष दामोदर कासकर, लीयो रॉड्रीगीस यांनी मुरगाव नगरपालिकेच्या हीतासाठी उत्तम कार्ये केलेली असून गीरीश बोरकर सुद्धा भविष्यात मुरगाव नगरपालिकेच्या विकासासाठी विविध उत्तम पावले उचलणार असल्याचा विश्वास साळकर यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष आपल्या सामान्य कार्यक्रर्त्याला सुद्धा त्याच्या कामाची योग्यरित्या परतफेड करत असून गीरीश बोरकर नगराध्यक्ष बनणे त्याचे एक चांगले उदहरण असल्याचे साळकर म्हणाले.

Web Title: BJP gives due respect to its activists Newly elected Mayor Girish Borkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा