भाजपला मिळाले चर्चिलचे बळ; लोकसभेसाठी जाहीर केला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:35 AM2023-04-23T10:35:51+5:302023-04-23T10:36:37+5:30

दोन्ही जागा भाजप जिंकणार आलेमाव यांच्याकडून दावा

bjp got churchill alemao strength announced support for lok sabha | भाजपला मिळाले चर्चिलचे बळ; लोकसभेसाठी जाहीर केला पाठिंबा

भाजपला मिळाले चर्चिलचे बळ; लोकसभेसाठी जाहीर केला पाठिंबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळणार, असा दावा करून माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिणेत भाजपचे चर्चिलच्या रूपाने बळ आणखी वाढले आहे.

शनिवारी आलेमाव यांनी वार्का येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गुणगान गाताना त्यांना डायनॅमिक मुख्यमंत्री असे संबोधले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ५० व्या वाढदिनानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्रमोद सावंत असेपर्यंत माझा पाठिंबा भाजपला, असेही त्यांनी सांगून टाकले. बाणावली मतदारसंघाचा आमदार असताना भाजप सरकारच्या मदतीनेच आपण या मतदारसंघात भरीव विकासकामे केली. त्याबाबत आपण भाजपचा उपकृत असल्याचेही आलेमाव यांनी सांगितले. 

बाणावली मतदारसंघात आपण २०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना ते गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांना आपण भेटून सुरावली अंडरपासच्या कामाबाबत मागणी केली असता त्यांनी ती तत्काळ संमत केली होती, याची आठवणही त्यांनी काढली. प्रमोद सावंत तसेच स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात विकासकामे राबविली.

आपण आमदार असताना बाणावलीत जी विकासकामे केली तीच सध्या या मतदारसंघात दिसत आहेत. सध्याचे आमदार फेसबुक आमदार असल्याचा टोलाही हाणताना मुख्यंमत्र्यांना तो साखळी मतदारसंघाबाबत चॅलेज करत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारला आपण पाठिंबा दिला म्हणून गत विधानसभा निवडणुकीत आपण हरलो, असे आलेमाव म्हणाले.

लोकसभेसाठी अनेकांची गळ

लोकसभा लढविण्यास आपण इच्छुक आहेत का? असे विचारले असता, त्याबाबत काही ठरले नसल्याचे आलेमाव म्हणाले. लोक त्यावर निर्णय घेतील. कमला लोकसभा निवडणूक लढविण्याची गळ घालत आहेत. मी दोनदा लोकसभा खासदार झालो आहे. त्यावेळी खासदारांना वर्षाला एक कोटी रुपये मिळत होते. आता खासदार निधीतून एका वर्षाला ५ कोटी मिळतात, विकासकामे मात्र दिसत नाहीत. हा निधी गेला कुठे, असा सवालही त्यांनी केला.

भाजप प्रवेशाचे नंतर बघू

भाजपचे तोंड भरून कौतुक करणारे चर्चिल आलेमाव यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार आहे का, असे विचारले तेव्हा त्यांनी त्याबाबतीत सध्या काहीच विचार नसल्याचे सांगून वेळ आल्यावर बघू, असे सांगून विषय संपवला.

काँग्रेस संपल्यात जमा

मुख्यंमत्री सावंत यांनी जी विकासकामे केली आहेत ती काँग्रेस ४० वर्षेही करू शकणार नाही. काँग्रेस आता संपली आहे, ती निद्रिस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरातील ३७० कलम हटविले. चांगले काम त्यांनी केले. देशात आज शांतता आहे. या शांततेमुळे विदेशी लोक भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: bjp got churchill alemao strength announced support for lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.